Mohan Bhagwat : हा हिंदू देश... हिंदूंनीच मुस्लिम लोकांचा सांभाळ केला!

  104

नागपुरातील व्याख्यानात मोहन भागवत यांचं वक्तव्य


नागपूर : इस्राईल आणि हमासमध्ये (Israel Hamas war) चालू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही बाजूंकडून साडेपाच हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आरएसएसचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी प्रतापनगर शिक्षण संस्थेने आयेजित केलेल्या एका व्याख्यानात भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे झाल्याच्या निमित्ताने हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळेस 'देशात सर्व धर्म आणि पंथांचा आदर करणारा एक धर्म आहे, हा हिंदूंचा (Hindu) देश आहे, सर्वांची काळजी घेणार्‍यालाच हिंदू असं म्हणतात आणि हे फक्त हिंदुस्थानच (Hindusthan) करतो', असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.


मोहन भागवत म्हणाले, जगात बाकी सगळीकडे मारामारी होत आहे. तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, युक्रेन युद्धाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, हमास आणि इस्राईलमध्येही युद्ध होत आहे. मात्र, आपल्या देशात अशा मुद्द्यावर कधीही भांडण झालेलं नाही. आम्ही या मुद्द्यावर कधीही लढलो नाही, अशा मुद्द्यांवर आम्ही कोणाशीही भांडत नाही, याचं कारण आपण हिंदू आहोत आणि हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ आपण इतर धर्म नाकारतो असा नाही. जर तुम्ही हिंदू बोलत असाल तर आम्ही मुस्लिमांनाही संरक्षण दिले हे सांगायची गरज नाही. सर्व धर्माचे रक्षण फक्त हिंदूच करतात. भारत हा एकमेव देश आहे जिथे प्रत्येक धर्म स्वीकारला जातो. इतरांनी तसे केले नाही. हिंदू धर्म सर्व पंथांचा आदर करतो. हिंदूंनी मुस्लिम लोकांचा सांभाळ केला, हे भारतच करू शकतो, असं मोहन भागवत म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन आपण अनुकरण करावं असंच आहे. त्यांचं अनुकरण म्हणजे, घोड्यावर बसण्याएवढं सोपं नाही, त्यांनी ज्या गुणांच्या आधारावर कर्तृत्व गाजवलं ते गुण कुठल्याही काळात महत्वाचे आहेत. त्यांना काय करायचं हे स्पष्ट माहित होतं, हा त्यांचा गुण होता. लोकांचं दुःख त्यांना बघवलं गेलं नाही, लोकांची दयनीय अवस्था, महिला असुरक्षितता, महिलांची दुर्दशा पाहून त्यांच्या मनात शोक निर्माण होत होता. शिवाजी महाराजांच्या काळात आई -वडील संस्कार द्यायचे. मात्र, आजकाल आई वडील हे मोबाईलमध्ये असतात, असं एक वास्तव मोहन भागवतांनी मांडलं.



आपल्याला माणसं राखता आली पाहिजेत


महाराजांनी मित्रांचा गोतावळा जमवला शिवाजी महाराज पुण्यात आल्यावर कसबा गणपती शोधून काढला आणि शेती करायला सुरुवात केली. लोकांना वसवलं. तरुण मित्र जमा केले, त्यांचाकडे असलेली कला निरखून लोक प्रेमानं जोडले. मित्रांचे दोष प्रेमानं दूर केले, संकटात मदत करत मैत्री केली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजा बनण्याची वेळ आली. तेव्हा प्रजेच्या संरक्षणासाठी ते राजा झाले. आपल्याला माणसं राखता आली पाहिजेत. तेव्हा आपण सुरक्षित असतो, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.



महाराजांचं मुसलमानांशी वैर नव्हतं


तेलंगणाचा कुतुबशाह शिवाजी महाराजांना घाबरला होता. शिवाजी महाराज यांचं विदेशी मुसलमानांशी भांडण होतं. भारतात राहणाऱ्या मुसलमानांशी वैर नव्हतं. शिवाजी महाराजांनी एक-एक माणूस उभा केला होता. शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभी केली, त्यामुळे त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले, असंही मोहन भागवत म्हणाले. तसेच, अफजल खान लोकांना त्रास देत असताना धैर्य ठेवून योग्य वेळेची वाट पाहिली. अफजल खान याला भेटायला जाऊन त्याचा डाव त्याच्यावरचं उलटवणं हे साहस आणि धैर्य बुद्धी चातुर्य महाराजांमध्ये होतं, असंही ते म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा