Thursday, May 7, 2026

World cup 2023: पाकिस्तानचा वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेवर जबरदस्त विजय

World cup 2023: पाकिस्तानचा वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेवर जबरदस्त विजय

हैदराबाद: पाकिस्तानच्या(pakistan) संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषकमध्ये जबरदस्त कामगिरी करताना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला आहे. मोहम्मद रिझवानच्या जबरदस्त शतकी खेळीने श्रीलंकेविरुद्धची बाजी एकट्याने पलटवली.

श्रीलेकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद ३४४ धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. पाकिस्तानने अब्दुल्लाह शफीक आणि मोहम्मद रिझवा यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर ४८.२ षटकांत ४ विकेट गमावत विजय मिळवला. रिझवानने १२१ बॉलमध्ये १३१ धावांची नाबाद खेळी केली.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रोमांचक ठरला. श्रीलंकेच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद ३४४ धावांचा डोंगर उभारला. कुशल मेंडिसने धमाकेदार १२२ धावांची खेळी केली. तर सदीरा समरविक्रमाने १०८ धावांची खेळी केली.

या दोघांच्या शानदार गोलंदाजीमुळे श्रीलंकेला मोठा स्कोर उभा करता आला. पाकिस्तानच्या सुरूवातीला दोन विकेट झटपट पडल्या. मात्र मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्लाह शफीकने केलेल्या भागीदारीमुळे सामन्याचा निकालच बदलला.

शफीकनंतर मोहम्मद रिझवानचे जबरदस्त शतक

विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात संघाला संकटातून बाहेर काढल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही मोहम्मद रिझवानने धमाका केला. विश्वचषकात पहिल्यांदा उतरणाऱ्या सलामीवीर अब्दुल्लाह शफीने शतक ठोकत पाकिस्तानला निर्णायक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा