पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सध्याच्या डावात ३७ धावांवर नाबाद खेळणारा जो रूट आता केवळ अर्धशतकाकडेच नव्हे, तर क्रिकेटचा देव मानल्या गेलेल्या सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) एका विशेष विक्रमाकडे लक्ष ठेवून आहे. या डावात आणखी १३ धावा जोडताच जो रूटच्या नावावर ६८ कसोटी अर्धशतकांची नोंद होईल. असे करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करेल.
सचिन तेंडुलकरच्या 'या' विक्रमावर जो रूटची नजर
सध्या जो रूटच्या खात्यात ६७ कसोटी अर्धशतके जमा आहेत. पाकिस्तानविरुद्धचा हा डाव जर ५० धावांपर्यंत पोहोचला, तर हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ६८ वे कसोटी अर्धशतक ठरेल. यासोबतच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो थेट सचिन तेंडुलकरसोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर विराजमान होईल.
Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत (Bhusawal Division of Central Railway) बुरहानपूर येथील लालबाग-खुनी भंडारा परिसरात रेल्वे व रस्ते वाहतूक पायाभूत सुविधा मजबूत ...
सचिन तेंडुलकरची कसोटी कारकीर्द
| फलंदाज | कसोटी सामने | कसोटी डाऊन/डाव | ५०+ धावा (अर्धशतके) |
| सचिन तेंडुलकर (भारत) 🇮🇳 | २०० | ३२९ | ६८ |
| जो रूट (इंग्लंड) 🏴ﮟ | १६७ | ३०५ | ६७ |
| शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज) 🌴 | १६४ | २८० | ६६ |






