Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023: आशियाई स्पर्धेत नीरजची सुवर्णकामगिरी, किशोरला रौप्यपदक

Asian Games 2023: आशियाई स्पर्धेत नीरजची सुवर्णकामगिरी, किशोरला रौप्यपदक

होंगझाऊ: भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा सुवर्णकामगिरी केली आहे. नीरजने आशियाई स्पर्धेत(asian games 2023) भालाफेक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळाले. नीरजसोबत किशोर जेनानेही जबरदस्त कामगिरी केली. त्यानेही पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे. किशोल भालाफेकमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला.

नीरजने पहिल्या प्रयत्नात ८२.३८ मीटर भालाफेक केला. दुसऱ्या प्रयत्नात ८४.४९ मीटर दूर भाला फेकला. त्याने चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटरपर्यंत भालाफेक केला. पाचव्या प्रयत्नात ८०.८० मीटर दूर थ्रो केला. तर किशोर जेनाने चौथ्या प्रयत्नात बेस्ट थ्रो केला. त्याने ८७.५४ मीटरपर्यंत दूर भाला फेकला. या पद्धतीने नीरजने भालाफेकमध्ये सुवर्ण तर किशोरने रौप्य पदक जिंकले.

भारताला मिळाले १८वे सुवर्णपदक

भारताला पुरुष ४*४०० मीटर मध्ये सुवर्णपदक मिळाले. भारतासाठी मोहम्मद अनस, अमोज, मोहम्मद अजमल आणि राजेशने सुवर्णपदक जिंकले.

महिलांना ४*४०० मीटर रिले स्पर्धेत जिंकले रौप्य

भारताच्या महिला टीमने ४*४०० मीटर रिले स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. ऐश्वर्या, प्राची, शुभा आणि विथ्याने जबरदस्त कामगिरी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -