बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (National Highway 6) वर भीषण अपघात (Buldhana Accident) झाला आहे. खामगाव – मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ महामार्गाच्या कडेला झोपलेल्या मजुरांना एका भरधाव ट्रकने चिरडले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहेत. अपघात झाल्याचे कळताच पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली. तसेच स्थानिकांनी देखील या ठिकाणी गर्दी केली. सध्या मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून जखमींना मलकापूर शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
रस्त्याच्या कडेला झोपलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामासाठी आले होते. रात्री दमून झोपलेल्या अवस्थेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. भरधाव ट्रक घेऊन येणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. सहा मजूर हे जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्व मजूर गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामावर मजुरी करण्यासाठी या ठिकाणी आले होते. सकाळी साडेपाच वाजता हे सर्व मजूर झोपलेले असताना यांना भरधाव ट्रकने चिरडलं. पोलिसांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने या सर्वांना मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…