Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीThackeray Group : संसदेच्या विशेष अधिवेशनात अनुपस्थित राहणं ठाकरे गटाच्या खासदारांना भोवणार

Thackeray Group : संसदेच्या विशेष अधिवेशनात अनुपस्थित राहणं ठाकरे गटाच्या खासदारांना भोवणार

चार खासदारांना शिवसेनेकडून मिळणार नोटीस

नेमकं प्रकरण काय?

मुंबई : ठाकरे गट (Thackeray Group) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shidne) यांची शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. त्यातच आता शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. व्हीप नाकारल्याने शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याकडून ठाकरे गटाला नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) , राजन विचारे (Rajan Vichare), संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचा यात समावेश आहे.

शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाकरता १४ सप्टेंबर रोजी एक व्हीप काढला होता. शिवसेना खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान करावे असा तो व्हीप होता. परंतु ठाकरे गटाचे चार खासदार अधिवेशनासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी मतदान केलेले नाही. ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे.

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या कृतीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाईल, असं शिवसेनेने एका पत्रकाद्वारे सूचित केलं आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अद्याप यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -