Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीOscar awards : ऑस्करमध्ये बाजी मारण्यासाठी भारत सज्ज... 'या' चित्रपटाची केली निवड

Oscar awards : ऑस्करमध्ये बाजी मारण्यासाठी भारत सज्ज… ‘या’ चित्रपटाची केली निवड

मल्याळम चित्रपट उतरणार ऑस्करच्या शर्यतीत

मुंबई : सिनेसृष्टीतला सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर (Oscar awards). हा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी अनेक चित्रपट निर्मात्यांची महत्त्वाकांक्षा असते. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अत्यंत खडतर आहे. यंदाच्या वर्षी या ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारण्यासाठी भारताने एका मल्याळम चित्रपटाची निवड केली आहे. केवळ १२ कोटींच्या बजेटमध्ये उभ्या राहिलेल्या मात्र बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या वर कमाई करणाऱ्या ‘२०१८ एव्हरीवन इज अ हिरो’ (2018 Everyone is a hero) या चित्रपटाचा भारताने ऑस्करसाठी अधिकृतरित्या प्रवेश नोंदवला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (Film Federation of India) याबाबत घोषणा केली आहे.

‘२०१८ एव्हरीवन इज अ हिरो’ हा अँथनी जोसेफ दिग्दर्शित चित्रपट ५ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात टोविनो थॉमस, कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला मल्याळम आणि नंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंतच्या मल्याळम चित्रपटांमध्ये ‘२०१८ एव्हरीवन इज अ हिरो’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई केली आहे.

हा चित्रपट २०१८ साली आलेल्या केरळ पुरावर आधारित आहे. केरळच्या महापुराने राज्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. या भीषण नैसर्गिक आपत्तीला लोक कसे धैर्याने तोंड देतात याची कहाणी या चित्रपटात अतिशय सुरेखपणे मांडण्यात आली आहे. पुरासारख्या समस्येवर मात करणाऱ्या लोकांची ही गोष्ट आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि आता हा चित्रपट ऑस्करवारी करण्यासाठी सज्ज आहे.

भारतामधून ऑस्करसाठी ‘द केरळ स्टोरी’पासून ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, तेलुगू चित्रपट ‘बालागम’, मराठी चित्रपट ‘वाळवी’, ‘बापल्योक’ आणि १६ ऑगस्ट १९४७, अशा २२ चित्रपटांचा समावेश होता ज्यात आता ‘२०१८’ या चित्रपटाने मजल मारली आहे. ऑस्करच्या शर्यतीत हा चित्रपट नेमकी काय जादू करतो याकडे आता सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -