Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीParineeti-Raghav Wedding First Photo: लग्नानंतर पहिल्यांदा समोर आला परिणीती-राघवचा फोटो

Parineeti-Raghav Wedding First Photo: लग्नानंतर पहिल्यांदा समोर आला परिणीती-राघवचा फोटो

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा(parineeti chopra) आणि राघव चढ्ढा(raghav chadha) यांनी सात जन्मासाठी एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिले आहे. उदयपूरच्या लील पॅलेसमध्ये झालेल्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. यात परिणीती अतिशय सुंदर दिसत आहे.

लग्नानंतर मिस्टर आणि मिसेस चढ्ढाचा फोटो आला समोर

मिस्टर आणि मिसेस चढ्ढा या फोटोत अतिशय सुंदर दिसत आहे. डोक्यात सिंदूर, हातात चुडा आणि गुलाबी साडीत परिणीती नव्या नवरीसारखी सुंदर दिसत आहे. तर राघव चढ्ढा ब्लॅक सूटमध्ये डॅशिंग दिसत आहे.

हा फोटो २४ सप्टेंबरच्या संध्याकाळच्या रिसेप्शनचा आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी फॅन पेज इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये सांगितले की हा फोटो रिसेप्शनचा आहे. लग्नानंतर कपलची पहिली झलक व्हायरल झाली आहे.

रविवारी परिणीती आणि राघव यांचे लग्न उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये झाले. २२ सप्टेंबरला लग्नाचे विधी मेहंदी सेरेमनीपासून सुरू झाले. २३ सप्टेंबरला हळद आणि सूफी नाईटमध्ये धम्माल झाली.

सिंगर नवराज हंस संगीत सेरेमनीमध्ये पोहोचले होते. त्याची एक झलकही सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर डिलीट केले.

कपल २५ सप्टेंबरला दिल्लीत परतणार

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा १३ मेला दिल्लीच्या कपुरथला हाऊसमध्ये झाला होता. या साखरपुड्यात जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -