Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : मराठा समाजाला टार्गेट करुन दंगली घडवण्याचा विरोधकांचा डाव

Nitesh Rane : मराठा समाजाला टार्गेट करुन दंगली घडवण्याचा विरोधकांचा डाव

हिंदूंच्या जातींजातींमध्ये भांडणं लावून जिहाद्यांच्या दाढ्या कुरवाळत बसणं हे विरोधकांचे धंदे

आमदार नितेश राणे यांचा जालन्यातील घटनेवर संताप

कणकवली : काल जालनातील अंबडमध्ये झालेल्या मराठा आंदोलन (Jalna Maratha Andolan) मोर्चावरील लाठीचार्जवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही. समाज बांधवांना विश्वास देतो की हा लाठीचार्ज कोणत्याही अधिकाऱ्यांनी मस्ती करून केला असेल तर त्यांच्यावर आमचं महायुतीचं सरकार कारवाई करणार, त्यांना सोडणार नाही, असा विश्वास आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला. आजच्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या केसची वाट लावणार्‍या मविआ आघाडीची त्यांनी चांगलीच हवा काढली.

नितेश राणे म्हणाले, शिवबा संघटनेचे पाटील हे मराठा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी चळवळींमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण त्यांना ओळखतो. मागे त्यांच्यावर एकदा चुकीची केस झाली होती तेव्हा सन्माननीय निलेश राणे यांनीच त्यांना वाचवलं होतं. त्यामुळे पाटलांची ओळख आम्हाला निश्चितपणे आहे. मराठा समाजाचे आजवर ५८ मोर्चे शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने निघाले आहेत. एवढ्या शांतपणे मोर्चे काढणारा आमचा मराठा समाज पोलिसांवर दगडफेक करेल हे मानणार्‍यांपैकी मी नाही. मग नेमकी ही दगडफेक केली कोणी? मराठा समाजाला बदनाम कोणाला करायचे आहे? असे खडे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.

विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या केसची वाट लावली

मराठा आरक्षण राणे समितीने दिलं आणि त्याला ताकदीने टिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. संपूर्ण मराठा समाजाला याची चांगलीच जाणीव आहे. कालपासून विरोधक फडणवीसजींना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे विरोधक जेव्हा मविआमधून सत्तेत होते तेव्हा याच मराठा आरक्षणाच्या केसची त्यांनी वाट लावली. ठाकरे सरकारने कोर्टात चांगला वकील न देता मराठा आरक्षणाची वाट लावली. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी मंत्री असताना मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून दिले. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये. त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, औरंग्याला मोठा कोणी केला? हे आम्हाला मराठा आरक्षणावर शिकवतायत? असा तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला.

अंबादास दानवे यांचाही हात

दंगली कोणाला हव्यात? कोणी त्या घडवून आणल्या? गेल्या आठवडाभरापासून कोण दंगल दंगल आवाज करतोय? पहिला उद्धव ठाकरे, मग संजय राजाराम राऊत, त्यामुळे याच दंगलीबद्दल हे बोलत होते का? काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये काही गाड्या पेटवण्यात आल्या, बस जाळपोळ झाली. यात कोणाचा हात होता? रघुनाथ शिंदे हा कोणाचा माणूस आहे? राज्याचा विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा तो निकटवर्तीय आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.

हिंदूंचे जनआक्रोश मोर्चे ही विरोधकांची पोटदुखी

विरोधकांचं मुख्य दुखणं मराठा आरक्षण नाही आहे पण राज्यामध्ये निघणारे जे हिंदूंचे जनआक्रोश मोर्चे आहेत, महाराष्ट्रातला हिंदू समाज एकत्र आलाय हे त्यांना बघवत नाही. जे जिहादी राज्यातल्या गावागावांमध्ये पोहोचले आहेत, जे औरंग्याला आपला बाप समजतात त्या जिहादींची दुकानं बंद व्हायला लागली आहेत म्हणून मुघलांनी जसं शिवरायांच्या काळात हिंदूंच्या जातींजातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न आता मविआचे नेते करत आहेत. त्या जिहाद्यांच्या दाढ्या कुरवाळत बसणं हे यांचे धंदे आहेत.

आम्ही हे महाराष्ट्रामध्ये कधीच खपवून घेणार नाही

मी सरकारला विनंती करणार आहे की, कोणत्याही मराठा समाजाच्या तरुणावर चुकीच्या केसेस घालता कामा नयेत यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. याबद्दल आमचे फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहेत. मी स्वतः जालनाला जाऊन त्या आंदोलनाला भेट देणार आहे. आम्ही वर्षानुवर्षे मराठा समाजासाठी लढतो आहोत, पण अशा पद्धतीने मराठा समाजाची माथी भडकवून आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर मराठा समाजाला टार्गेट केल जात असेल तर ते आम्ही महाराष्ट्रामध्ये कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -