Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीकाँग्रेसकडून कर्नाटकात महिलांना दर महिना २००० देणार!

काँग्रेसकडून कर्नाटकात महिलांना दर महिना २००० देणार!

निवडणुकीच्या वर्षात महिलांसाठी भेटीचा वर्षाव

बंगळुरु : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) अवघे काही महिने उरले आहेत. पुढील वर्ष निवडणुकीचे आहे. काल केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपये कपात केल्यानंतर आज काँग्रेस कर्नाटकात महिलांना दर महिना २ हजार रुपयांचा भत्ता देणारी योजना लागू करत आहे.

काल गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपये कपात झाली आणि ही देशातल्या तमाम महिला वर्गासाठी मोदींकडून रक्षाबंधनाची भेट असल्याचे केंद्रीय मंत्र्यांना जाहीर केले. आज याच महिलांसाठी काँग्रेस कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ आज राहुल गांधींच्या उपस्थितीत करण्यात आला. कर्नाटकच्या निवडणुकीत मतदारांना काँग्रेसने जी पाच प्रमुख आश्वासने दिली होती. त्यापैकी एक आहे गृहलक्ष्मी योजना.

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या पाच प्रमुख आश्वासनांपैकी तीन योजना काँग्रेसने आधीच लागू केल्या आहेत. शक्ती, गृहज्योती आणि अन्नभाग्य या तीन योजना कर्नाटक सरकारने आधी लागू केल्या आहेत. गृहलक्ष्मीनंतर युवा निधी या योजनेंतर्गत काँग्रेस बेरोजगार युवकांनाही बेरोजगार भत्ता देणार आहे.

दोन्ही पक्ष याला महिलांसाठी रक्षाबंधनाची भेट म्हणतायत. पण याची परतफेड करताना महिला मतदार कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार हे पाहणे महत्वाचे असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -