Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीImran Khan : तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना हाय कोर्टाकडून दिलासा

Imran Khan : तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना हाय कोर्टाकडून दिलासा

जामीन करण्यात आला मंजूर

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (Tehreek-E-Insaf) या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना हाय कोर्टाकडून (High court) दिलासा मिळाला आहे. तोशखाना प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या शिक्षेस स्थगिती देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात त्यांना ५ ऑगस्ट रोजी पाकिस्तानमधील जिल्हा सत्र न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती व लाहोरमधल्या जमान पार्क येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. न्यायालयाकडून त्यांना १ लाख रुपयांचा दंड तसेच ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी देखील घालण्यात आली आहे.

तोशखाना प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानमधील मुस्लीम लीग-नवाझ (PML-N) पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी ऑगस्ट २०२२ मध्ये इम्रान खान यांच्यावर तोशखाना प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. लोकप्रतिनिधींना मिळालेल्या भेटवस्तूंची नियमाप्रमाणे तोशखाना विभागाकडे माहिती द्यावी लागते. मात्र पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती उघड केली नाही. शिवाय या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्या, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

तोशखाना प्रकरण नेमकं काय?

पाकिस्तानमध्ये तोशखाना विभागाची १९७४ साली स्थापना झालेली आहे. लोकप्रतिनिधींना मिळालेल्या भेटवस्तू नियमाप्रमाणे या विभागात जमा करत माहिती देणं बंधनकारक असतं. परंतु, २०१८ साली सत्तेवर आल्यानंतर इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाला देण्यास नकार दिला. माहिती दिल्यास अन्य देशांशी असलेल्या संबंधावर परिणाम होईल, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाला पत्र लिहून मिळालेल्या भेटवस्तूंपैकी साधारण ४ भेटवस्तूंची विक्री केल्याचं कबूल केलं होतं. विक्री केलेल्या भेटवस्तूंची तोशखाना विभागाला उचित किंमत दिल्याचाही दावा इम्रान खान यांनी केला होता.

खान यांच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित

दरम्यान, तुरुंगातून बाहेर पडल्यावर इम्रान खान यांना दुसऱ्या कुठल्या प्रकरणात पुन्हा कैद केलं जाऊ नये, अशी इम्रान खान यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली आहे. मात्र खान यांच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत. यातील दोन प्रकरणांमध्ये तर तपास यंत्रणा इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक करू शकते. पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सी (Federal Investigation Agency) आणि नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोची (National Accountability Bureau) पथकं इम्रान खान यांची वाट पाहत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -