नवी दिल्ली: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३मध्ये (world athletics championship 2023) बुडापेस्ट येथे पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने (neeraj chopra) सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला. गेल्या वर्षी याच स्पर्धेत २०२२मध्ये तो गोल्ड मेडल जिंकण्यापासून दूर राहिला होता. आणि युजिनमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये त्याने रौप्य पदक मिळवले होते.
मात्र यावेळेस त्याने कोणतीही चूक केली नाही आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. नीरज चोप्रा आता ऑलिम्पिक चॅम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन दोन्ही आहे. तसेच हे यश मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
भारताच्या तिरंग्यावर सही देण्यास दिला नकार
नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक यशानंतर हंगेरीची एक महिला चाहतीने त्याच्याकडे ऑटोग्राफ मागितला. त्यासाठी तिने नीरज चोप्रासमोर भारताचा तिरंगा ठेवला आणि त्यावर ऑटोग्राफ मागितला. मात्र नीरज चोप्राने यासाठी साफ नकार दिला. यानंतर त्याने महिलेच्या टीशर्टवर सही केली आणि महिला चाहती खुश झाली. नीरज चोप्राने तिरंग्याच्या सन्मानासाठी जे काही केले ते पाहून सारेचजण त्याचे कौतुक करत आहेत.
After winning the gold medal, Neeraj Chopra wins hearts with his gesture, refuses to sign an autograph on the Indian flag.#feedmile #athlete #NeerajChopra #netizens #indianflag pic.twitter.com/XC9B3yMLIZ
— Feedmile (@feedmileapp) August 28, 2023
नीरज चोप्राने हंगेरीतील बुडापेस्टमध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३मध्ये भालाफेक स्पर्धेत ८८.१७ मीटर भाला फेकत पहिल्या स्थानावर राहत सुवर्णपदकावर कब्जा केला होता. नीरज केवळ २५ वर्षांचा आहे. मात्र त्याने या इतक्या कमी वयात मिळालेले यश हे वाखाणण्याजोगे आहे.
नीरज चोप्राने मिळवलेलेल यश
दक्षिण आशियाई खेळ २०१६ मध्ये सुवर्णपदक
आशियाई चॅम्पियनशिप २०१७मध्ये सुवर्णपदक
कॉमनवेल्थ गेम्स २०१८मध्ये सुवर्णपदक
आशियाई गेम्स २०१९मध्ये सुवर्णपदक
ऑलिम्पिक २०२०मध्ये सुवर्णपदक
डायमंड लीग २०२२मध्ये सुवर्णपदक
वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२मध्ये रौप्य पदक
वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३मध्ये सुवर्णपदक