Jitendra Awhad vs Hasan Mushrif : ‘मी नाय त्यातली.. म्हणणा-या आव्हाडांना लोकच कोल्हापुरी पायताणाने हाणतील’

Share

जितेंद्र आव्हाडांच्या कोल्हापुरी चप्पलेवर हसन मुश्रीफांचे चोख प्रत्युत्तर!

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांच्या गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरमधील सभेत अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर (Jitendra Awhad vs Hasan Mushrif) जोरदार टीका केली होती. त्यावर ‘मी नाय त्यातली.. म्हणणा-या जितेंद्र आव्हाड यांच्या लपवलेल्या गोष्टी उघडकीस आल्यावर लोकच त्यांना असली कोल्हापुरी पायताणाने हाणतील,’ अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूर सभेत अजित पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना थेट गद्दार म्हटलं होतं. गद्दारी काही लोकांच्या रक्तातच असते, ते आता महाराष्ट्राला दिसत आहे. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायताण प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोला आव्हाडांनी लगावला होता.

त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. पण त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं आहे. त्यांनी अजित पवार आणि आमच्याविषयी असं बोलायला नको. ज्यावेळी आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात जितेंद्र आव्हाड यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की कळेल त्यांना, असे मुश्रीफ म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Raigad Accident : भीषण अपघात! दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

१५ ते २० प्रवासी जखमी, २ जण गंभीर रायगड : काही दिवसांपूर्वी पोलादपूर (Poladpur) येथे…

22 mins ago

PMPML Bus : पुणेकरांसाठी खुशखबर! आता घरबसल्या पीएमपीएमएलचे तिकीट काढता येणार

पासही काढू शकता ऑनलाईन पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी (Pune news) समोर आली आहे.…

42 mins ago

Shahapur Rain : शहापूरात रात्रभर पावसाची जोर ‘धार’!

भारंगी नदीला पूर, गाड्या वाहून गेल्या, वाहतूकही ठप्प खर्डी : जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाने…

1 hour ago

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा! तर दोन जवान शहीद

अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी आले वीरमरण अकोला : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यात काल…

1 hour ago

Buldhana Crime : धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास महिलेचा नकार; डॉक्टराने केले असे काही…

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाण्यात…

2 hours ago

Worli Hit and Run : धक्कादायक! वरळीत हिट अँड रन प्रकरणात महिलेचा मृत्यू

कारचालक फरार मुंबई : राज्यभरात हिट अँड रनच्या (Heat And Run) वाढत्या केसेसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले…

2 hours ago