Gaddar controversy : अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा, हिंमत आहे का?

संजय शिरसाटांचे ठाकरे गटाला थेट आव्हान


मुंबई : वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षातून बंड केल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गटातून (Thackeray Gat) अनेक आरोप- प्रत्यारोप झाले. एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेल्या आमदारांना ठाकरे गटाकडून वारंवार 'गद्दार' असं म्हटलं जातं. साधारण दोन महिन्यांपूर्वी मविआचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतही (NCP) अशीच फूट पडली. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांचा पाठिंबा मिळवत सरकारला साथ दिली. मात्र अजित पवार गटाला शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून कोणीही गद्दार म्हटलं नाही. यावर मविआतील आणखी एक पक्ष फुटल्याने शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे.


ठाकरे गटावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, काहीही करून आता लोकांच्या मनावर परिणाम होणार नाही. आम्हाला गद्दार म्हणता, अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा, हिंमत आहे का? स्वतःचे घर भरण्यासाठी यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार विकले. त्यांनी काय लपवले, दडवले हे काही दिवसानंतर बाहेर येईल. ठाकरे गटाकडे कार्यकर्ते नसतील पण पैसे नाही असं आम्ही तरी म्हणू शकत नाही. आम्ही बरंच जवळून पाहिलं. त्यांना आउंटगोइंग नको फक्त इनकमिंग पाहिजे, खोके छोटा शब्द आहे, तिकडे कंटेनर आहेत, असं राज ठाकरे साहेब सुद्धा म्हणाले होते, असंही शिरसाट यांनी नमूद केलं.


दरम्यान शरद पवार यांच्या अजित पवार आमचेच नेते आहेत, या विधानावर शिरसाट म्हणाले की, पवार साहेबांनी काही तासांतच वक्तव्य बदलले, हा गोंधळ का सुरू आहे, कारण काही लोकांना शरद पवार साहेबांची भूमिका कळत नाही. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणाले होते की, विश्वासघात होऊ शकतो, तरी त्यांच्या साहेबांना हे कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी याचा अभ्यास करावा आणि बडबड भोंग्याला लाथ मारून बाहेर काढावे. संजय राऊत म्हणतात हा गनिमी कावा आहे. अहो, हे अकलेचे तारे तोडत असल्याचा टोलाही शिरसाट यांनी लगावला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल