दिसपूर: आसामच्या (assam) हिमंता बिस्वा सरमा सरकारने राज्यात बहुविवाह (polygamy) संपवण्याच्या उद्देशाने आपले पाऊल टाकले आहे. यासाठी सरकारने प्रस्ताविद कायद्याबाबत जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक सरकारी सार्वजनिक नोटीस जाहीर करताना लोकांकडून आसाममधील एकापेक्षा अधिक विवाहावर बंदी घालण्याबाबतच्या प्रस्तावित कायद्यावर सल्ले देण्याचे अपील केले आहे.
गृह तसेच राजकीय विभागाचे प्रधान सचिव यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये लोकांना ३० ऑगस्टपर्यंत इमेल अथवा पोस्टाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात असाही उल्लेख करण्यात आला आहे की आसाम सरकारने बहुविवाहावर बंदी घालण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला रिपोर्ट सरकारला सादर केला आहे. यावर आता सरकार पुढील कारवाई करणार आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की राज्य विधानसभा बहुविवाहाच्या प्रथेवर बंदी घालण्यासाठी कायदा बनवण्यास सक्षम आहे. विवाह समवर्ती सूचीच्या अंतर्गत येते ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदा बनवू शकतात.
नोटीसमध्ये तज्ञ समितीच्या रिपोर्टचा हवाला देताना म्हटले की, इस्लामच्या संबंधामध्ये कोर्टाचे म्हणणे आहे की एकापेक्षा अधिक पत्नी असणे हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. पत्नीची संख्या मर्यादित राखणारा कायदा धर्माचे अनुपालन करण्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे एकच विवाहाला समर्थन देणारे कायद्याच्या अनुच्छेद २५चे उल्लंघन करत नाहीत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…