मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमि्त (Independence Day 2023) इंडियन एअरलाईन्स स्पाईसजेटकडून एक शानदार ऑफर मिळत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही स्वस्तात हवाई यात्रेचा आनंद उठवू शकता. कंपनीने स्पेशल इनक्रेडिबल इंडिपेंडन्स डे सेल (special Incredible Independence Day sale) ची घोषणा केली आहे. हा सेल १४ ऑगस्टपासून सुरू झाला असून ही ऑफर २० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
स्पाईसजेट सेलमध्ये तुम्ही केवळ १५१५ रूपयांमध्ये तुम्ही विमानप्रवासाचे तिकीट बुक करू शकता. तिकीटाच्या या किंमतीमध्ये सर्व प्रकारचे टॅक्स जोडलेले आहेत. यासोबतच तुमच्या आवडीचे सीट तुम्ही केवळ १५ रूपयांत निवडू शकता. सोबतच तुम्हाला २००० रूपयांचे तिकीट वाऊचरही मिळेल. जाणून घेऊया याबद्दल…
३० मार्च २०२४ पर्यंत
कंपनीने या सेलची माहिती आपल्या जुन्या ट्विटर हँडलवर दिली आहे. यात तुम्ही १५ ऑगस्टपासून पुढील वर्षी ३० मार्च २०२४ या कालावधीपर्यंतचे तिकीट बुक करू शकता. या ऑफर ऑफर सेलमधून कोणतेही प्रवासी अनेक ठिकाणी फिरू शकतात. या सेलमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत तिकीट तसेच अनेक लाभ मिळू शकतात. कंपनीने सांगितले की ते २००० रूपयांचे फ्लाईट व्हाऊचरही देत आहे. हे कॉम्प्लिमेंटरी वाऊचर असेल.
Give flight to your freedom with SpiceJet’s Independence Day Sale. Unbeatable airfares starting at just ₹1515 (inclusive of all taxes). Book your tickets now and avail exciting offers — Get a free flight voucher worth ₹2000 and reserve your preferred seats for just ₹15. ✈ pic.twitter.com/8J8Uru5HkM
— SpiceJet (@flyspicejet) August 14, 2023
या ठिकाणी फिरण्याची संधी
१५१५ रूपयांता एका बाजूने प्रवासाची ऑफर आहे. मुंबई-गोवा, जम्मू-श्रीनगर, गोवा-मुंबई, गुवाहाटी-बागडोगरा, चेन्नई-हैदराबाद सारख्या प्रसिद्ध डोमेस्टिक रूट्सवर ही ऑफर दिली जात आहे. ही ऑफर डायरेक्ट डोमेस्टिक बुकिंग्सकडून एका बाजूच्या प्रवासावर व्हॅलिड आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ग्रुप बुकिंग्समध्ये याचा फायदा मिळणार नाही आणि याला दुसऱ्या कोणत्याही ऑफरसोबत जोडता येणार नाही.