Friday, May 29, 2026

GT vs RR : एका कॅचने फिरवला सामना; राजस्थानच्या हातून निसटली IPL फायनलची संधी!

GT vs RR : एका कॅचने फिरवला सामना; राजस्थानच्या हातून निसटली IPL फायनलची संधी!

मुंबई : आयपीएल २०२६ च्या (IPL 2026) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (Qualifier) गुजरात टायटन्सने (GT) राजस्थान रॉयल्सचा (RR) ७ विकेट्स राखून पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली. मुल्लानपूर येथे झालेल्या या रोमांचक सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २१४ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. मात्र गुजरातच्या फलंदाजांनी (Batsmen) दमदार कामगिरी करत हे आव्हान सहज पार केले आणि फायनलचे (Final) तिकीट निश्चित केले.

२१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला कर्णधार शुभमन गिल (Captain Shubhman Gill) आणि साई सुदर्शन यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत पहिल्या विकेटसाठी तब्बल १६७ धावांची भागीदारी रचली. साई सुदर्शन ५८ धावांवर बाद झाला, तर शुभमन गिलने ५३ चेंडूत १०४ धावांची तुफानी शतकी खेळी साकारली. या दोन्ही फलंदाजांच्या खेळीमुळे गुजरातचा विजय जवळपास निश्चित झाला होता.

सलामीवीर बाद झाल्यानंतर जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानात उतरले. सुंदरने १६ धावा केल्या, तर त्यानंतर आलेल्या राहुल तेवतियाने ९ चेंडूत १७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. जोस बटलरनेही संयमी फलंदाजी करत गुजरातला विजयापर्यंत पोहोचवले. अखेर गुजरातने ७ विकेट्स राखून सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता आयपीएल २०२६ च्या विजेतेपदासाठी गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ४७ चेंडूत ९६ धावांची शानदार खेळी केली. मात्र शेवटच्या षटकांमध्ये डोनोव्हन फरेराने अवघ्या ११ चेंडूत ३८ धावांची (Runs) स्फोटक खेळी करत राजस्थानची धावसंख्या २०० पार नेण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे तो राजस्थानच्या डावातील सर्वात मोठा हिरो ठरला होता.

परंतु दुसऱ्या डावात हाच डोनोव्हन फरेरा राजस्थानसाठी व्हिलन ठरल्याचं दिसलं. गुजरातची जोडी लयीत असताना नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर साई सुदर्शनने हवेत फटका मारला होता. त्यावेळी फरेराकडे सोपा झेल (Catch) आला होता. मात्र त्याच्याकडून हा महत्त्वाचा झेल सुटला. त्या वेळी सुदर्शन बाद झाला असता तर सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलू शकले असते.

झेल (Catch) सुटल्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर दबाव वाढवत १६७ धावांची विक्रमी भागीदारी उभारली. या भागीदारीनेच गुजरातच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे शेवटच्या षटकांत फलंदाजीने हिरो ठरलेला डोनोव्हन फरेरा एका कॅच ड्रॉपमुळे राजस्थानच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरल्याचे बोलले जात आहे. एका चुकीमुळे राजस्थान रॉयल्सच्या हातून आयपीएल २०२६ च्या अंतिम फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी निसटली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >