औरंगजेब स्टेटसवरुन सभागृहात गदारोळ… पण सभागृहाबाहेर जे घडलं…
मुंबई : औरंगजेब स्टेटसप्रकरणी (Aurangzeb status) आज विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) प्रचंड आक्रमक झाले. आपल्या राज्यामध्ये असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाहीत पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा ‘सर तन से जुदा’ आणि ‘औरंग्या माझा बाप आहे’, अशा घोषणा देतात. हे राज्याचं वातावरण खराब करतात. या लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही. असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता? असा सवाल करत अब्बु आझमी (Abbu Azmi) आणि रईस शेख (Rais Shaikh) यांना उददेशून नितेश राणे गददार म्हणाले.
यावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख हे सभागृहाबाहेर पत्रकार परिषद घेत होते. यावेळी रईस शेख यांनी नितेश राणेंवर टीका केली. गेल्यावेळीही राणेंनी मला गद्दार म्हटलेले, आताही त्यांनी गद्दार म्हटलेय. ही त्यांनी मानसिकता आहे. त्यांच्या डोक्यात हे भरलेले आहे. या मानसिकतेविरोधात लढण्याची गरज आहे, असे शेख म्हणाले.
शेख हे सर्व बोलत असताना नितेश राणे त्यांच्या मागेच उभे होते. नितेश राणे यांनी खुणेनेच एका पत्रकाराला ‘त्यांना सांग मी मागेच उभा आहे’, असा इशारा केला. शेख यांना हे समजताच त्यांनी मागे वळून पाहिले आणि बोलणे थांबवले. यावर ते नितेश राणे यांना ‘आपने ऐसा कहा या नही’ अशी विचारणा करत होते. नितेश राणे यांनी त्यावर ‘तो और क्या कहेंगे?’ अशी प्रतिक्रिया देत शेख यांना गप्प केले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra