Sunday, May 31, 2026

BJP MLC Candidates : विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर

BJP MLC Candidates : विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर

मुंबई : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला असताना, भाजपने आपल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. असे असले तरी नाशिकबाबत सस्पेन्स कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत पडद्याआड जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, जाहीर झालेल्या यादीनुसार ही जागा भाजपने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले असून, येथून सुहास शिरसाट यांना मैदानात उतरवले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीला (मविआ) खिंडार पाडत भाजपमध्ये प्रवेश केलेले शरद पवार गटाचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचे 'बक्षीस' म्हणून तनपुरे यांना तातडीने उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे, नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. येथे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे दोन खंदे समर्थक, शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते उमेदवारीसाठी आमनेसामने ठाकले आहेत. या दोन्ही नेत्यांनी अर्ज खरेदी केल्याने नाशिक भाजपमधील अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आता पक्षासमोर असणार आहे.

......

उमेदवारी कोणाला?

  1. अरुण लखानी - वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
  2. अविनाश ब्राह्मणकर - भंडारा, गोंदिया
  3. प्रवीण पोटे पाटील - अमरावती
  4. धैर्यशील कदम - सांगली, सातारा
  5. राजेंद्र राऊत - सोलापूर
  6. प्राजक्त तनपुरे - अहिल्यानगर
  7. सुहास शिरसाट - छत्रपती संभाजीनगर-जालना
  8. अमर राजूरकर - नांदेड
  9. बसवराज पाटील - धाराशिव-लातूर-बीड
  10. नंदकिशोर महाजन - जळगाव
  11. डॉ. राजीव पोतदार - नागपूर (पोटनिवडणूक)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment