Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीMaharashtra Assembly Opposition Leader : शिक्कामोर्तब! चर्चेत असलेली नावे सोडून 'या' नेत्याला...

Maharashtra Assembly Opposition Leader : शिक्कामोर्तब! चर्चेत असलेली नावे सोडून ‘या’ नेत्याला मिळाले विरोधी पक्षनेतेपद

जाणून घ्या कोणत्या पक्षाचा ठरला विरोधी पक्षनेता…

मुंबई : राज्यातील सत्तानाट्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेता (Maharashtra Assembly Opposition Leader) कोण हा मुद्दा चर्चेत आला होता. यापूर्वी विरोधी पक्षनेता असलेले सद्यकालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सरकारला पाठिंबा दिल्याने एक मोठी राजकीय उलथापालथ झाली. या घटनेला उद्या म्हणजेच दोन ऑगस्टला एक महिना पूर्ण होईल. त्यामुळे जवळजवळ महिनाभर विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामीच होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संख्याबळ कमी झाल्याने काँग्रेसने (Congress) विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा केला होता. त्यानुसार आता विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना देण्यात आली असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

२०१४ ते २०१९ या कार्यकाळात अखेरच्या तीन महिन्यांत विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपसोबत गेल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली होती. आता, दुसऱ्यांदा त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळत आहे. त्यामुळे, काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांचं स्थान वाढल्याचं दिसून येतं.

महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून आले आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan), अशोक चव्हाण (Ashok Chavhan)आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे तीन नेत्यांची नावे चर्चेत असताना विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -