बुलढाणा : मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज रात्री तीन वाजता दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने भीषण अपघात (Malkapur Accident) झाला. यामध्ये ७ जण ठार झाले आहेत तर २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. सर्व मृत हे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ३५ ते ४० तीर्थयात्री घेऊन एम एच ०८.९४५८ ही ट्रॅव्हल्स (Travels) अमरनाथची तीर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर एम.एच २७ बी.एक्स. ४४६६ ही ट्रॅव्हल्स २५ ते ३० प्रवशांना घेऊन नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्स मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. या घटनेत गंभीर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली चमूने शर्थीचे उपचार केले. मात्र २५ जणांपैकी ५ जणांच्या डोक्यात व पोटावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
घटनास्थळाला पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, ग्रामीण पोलीस निरीक्षक फरहात मिर्झा यांनी भेट दिली. पोलीस आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नाने गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…