पुणे : पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अनेक चित्रविचित्र घटना घडत आहेत. पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुण विद्यार्थ्यांच्या बाबतीतील या घटना जास्त प्रमाणात आहेत. अशीच एक खळबळजनक घटना पुन्हा समोर आली आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) शिकणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओम कापडणे (Om Kapadane) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यातील वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात (Vishnu Kunj Hostel) राहत होता आणि या ठिकाणीच त्याने आत्महत्या केली.
ओम कापडणे फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात (BSc Third year) शिकत होता. तो मूळचा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील होता आणि शिक्षणाकरता त्याने पुणे गाठले होते. पुण्यात वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात तो राहत होता. याच वसतिगृहात त्याने गुरुवारी २७ जुलैला गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच ओमला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केलं.
या प्रकरणाची चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ओमने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याने वसतिगृहातील ज्या खोलीत गळफास घेतला तिथे कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही किंवा अजूनपर्यंत काही हाती लागलेले नाही. त्यामुळे पोलीस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा कसून तपास सुरु असल्याचं चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितलं.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…