Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीShirish Kanekar : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

Shirish Kanekar : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरीष कणेकर यांची आज सकाळी प्रकृती खालावली. यानंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिरीष कणेकर यांच्या निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
पत्रकार,चित्रपट व क्रिकेट समीक्षक,ललित लेखक,एकपात्री कलाकार अशी ओळख असलेल्या शिरीष कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी पुण्यात झाला. रायगड जिल्ह्यातील पेण हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठात कायद्याची पदवी घेतली. इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी यासाठी शिरीष कणेकरांनी काम केले.
सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचे लेखन प्रसिद्ध होते. माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तके आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले. यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, कणेकरी, लगाव बत्ती, आसपास, मेतकूट, चित्ररुप, फिल्लमबाजी, कल्चर व्हल्चर या नावांनी त्यांनी स्तंभलेखन केले.

शिरीष कणेकर यांचा अल्पपरिचय  

पत्रकार,चित्रपट व क्रिकेट समीक्षक,ललित लेखक,एकपात्री कलाकार  

नाव :शिरीष मधुकर कणेकर 
जन्म :६ जून १९४३,पुणे (महाराष्ट्र)
मूळ गाव :पेण,जिल्हा रायगड
शिक्षण :मुंबई विद्यापीठाची कायद्याची पदवी
वृत्तपत्रीय कारकीर्द :इंडियन एक्सप्रेस (१९६८-१९८०),’डेली'(१९८०-१९८२),’फ्री प्रेस जर्नल ‘(१९८२- १९८५),’सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सि ‘(१९८५-१९८९)यांत इंग्रजी पत्रकारिता.
सद्य व्यवसाय :मुक्त पत्रकारिता,मराठीतून स्तंभलेखन.एकपत्री कार्यक्रम.
पहिले लेखन :जोर्जं गन :एक लहरी फलंदाज (‘अमृत’,जानेवारी १९६४)
ग्रंथलेखन क्रिकेट :’क्रिकेट-वेध ‘(प्रथम प्रकाशन १९७७).दुसरी आवृत्ती संपली.
हिन्दी चित्रपट संगीत :’गाये चला जा ‘(प्रथम प्रकाशन १९७८).पाचवी सुधारित आवृत्ती.
हिन्दी चित्रपट :’यादो की बारात'(प्रथम प्रकाशन १९८५)
व्यवसायिकाची व्यक्तिचित्रे :तिसरी आवृत्ती. पुन्हा यादों की बारात ,(प्रथम प्रकाशन १९९५)दुसरी आवृत्ती.
हिन्दी चित्रपटाविषयी :’शिरिषासन ‘(प्रथम प्रकाशन १९८४)आवृत्ती संपली.
‘फिल्लमबाजी'(प्र.प्र. १९८०)आवृत्ती संपली.
‘पुन्हा शिरिषासन ‘(प्र.प्र. १९८५)आवृत्ती संपली.
‘कणेकरी’ (प्रथम प्रकाशन १९९१)आवृत्ती संपली.
‘नट बोलट बोलपट’ (प्रथम प्रकाशन १९९९ )
‘शिनेमा डॉट कॉम ‘(प्रथम प्रकाशन २००१).दुसरी आवृत्ती २००७
रहस्यकथा :’रहस्यवल्ली’ (प्रथम प्रकाशन १९८६) आवृत्ती संपली.
ललित :’चाहटळणी’ (प्र.प्र.१९९५) तिसरी आवृत्ती.
‘इरसालकी’ (प्रथम प्रकाशन १९९७)दुसरी आवृत्ती.
‘चापलूसरकी’ (प्रथम प्रकाशन १९९८) दुसरी आवृत्ती.
‘साखरफुटाणे’ (प्रथम प्रकाशन २००१)
‘गोली मार भेजेमें'(प्रथम प्रकाशन २००१) (दुसरी आवृत्ती )
‘सुरपारंब्या’ (प्रथम प्रकाशन २००१)
‘लगाव बत्ती’ (प्रथम प्रकाशन २००२) (दुसरी आवृत्ती २००७)
डॉ. काणेकरांचा मुलगा (प्रथम प्रकाशन २००३) (दुसरि आवृत्ती २००९)
मखलाशी (प्रथम प्रकाशन २००४ )
मनमुराद (प्रथम प्रकाशन २००४, दुसरी आवृत्ती २०११)
नानकटाई (प्रथम प्रकाशन २००५)
खटल आणि खटला (प्रथम प्रकाशन २००५)
चापटपोळी (प्रथम प्रकाशन२००६)
मेतकूट (प्रथम प्रकाशन २००७)
फटकेबाजी (प्रथम प्रकाशन २००६,दुसरी आवृत्ती २०१० )
तिकडमबाजी (प्रथम प्रकाशन २००९)
आंबटचिंबट (प्रथम प्रकाशन २०१०)
मोतिया (प्रथम प्रकाशन २०१०)
चंची (प्रथम प्रकाशन २०११)
कट्टा (प्रथम प्रकाशन २०१२)
एककेचाळीस (प्रथम प्रकाशन २९१५)
टिवल्या बावल्या (प्रथम प्रकाशन २०१६)
कुरापत (प्रथम प्रकाशन २०१७)
यारदोस्त (प्रथम प्रकाशन २०१८)
प्रवासवर्णन :’ते साठ दिवस’ (प्रथम प्रकाशन १९९७)
‘डॉलरच्या देशा’ (प्रथम प्रकाशन २००२)(चौथी आवृत्ती)
एकपात्रीचे अनुभव कथन :’एकला बोलो रे’ (प्रथम प्रकाशन १९९७) (तिसरी आवृत्ती)
एकपात्रीची संहिता :माझी फिल्लमबाजी’ (प्रथम प्रकाशन २००२)
व्यक्तिचित्रे :’गोतावळा’ (प्रथम प्रकाशन २०००) (तिसरी आवृत्ती)
समग्र संकलन :’वेचक शिरीष कणेकर’ (प्रथम प्रकाशन २००१) दुसरी आवृत्ती
कणेकरायण (प्रथम प्रकाशन २००८)
भाषांतरे :गाये चला जा’ व ‘यादों की बारात’ यांची गुजराथी भाषांतरे प्रसिद्ध, अनेक लेखांची
गुजराथी व हिंदीत भाषांतरे. ‘यादों की बारात’चे इंग्रजीतून ‘वेबसाइट’वर प्रसारण.
पारितोषिके :
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै.विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार’१९९९.
नाशिक नगरपालिका वाचानालयातर्फे ‘सुरपारंब्या’ या संग्रहास सर्वोत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा पुरस्कार.
‘लगाव बत्ती’ या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा चि.वि.जोशी पुरस्कार.
स्तंभलेखन 
लोकसत्ता :यादों की बारात,शिरिषासन,सिनेमाबाजी,गुद्दे आणि गुदगुल्या,चहाटळकी, सुरपारंब्या
महाराष्ट्र टाइम्स :सिनेमागिरी,लगाव बत्ती
लोकमत :कणेकरी
सामना :कणेकरी, चिमटे आणि गळगुच्चे, मोतिया,टिवल्या बावल्या
पुढारी :चिमटे आणि गालगुच्चे
साप्ताहिक मनोहर :आसपास
साप्ताहिक लोकप्रभा :कणेकरी,मेतकूट
साप्ताहिक प्रभंजन :चित्ररूप
साप्ताहिक चित्रानंद :शिरीषासन
पाक्षिक चंदेरी :कणेकरी
सिंडिकेटेड कॉलम :फिल्लमबाजी
The Daily :culture vulture
रंगमंचीय कारकीर्द :भारतीय रंगभूमीवर ‘स्टँड अप कॉमेडी’ प्रथम आणली. ‘माझी फिल्लमबाजी’,’फटकेबाजी’ व ‘कणेकरी’ या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन,दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण केले.
‘या कातरवेळी ‘या कार्यक्रमाचे लेखन व सादरीकरण.आजवर केवळ परदेशात प्रयोग.
रंगमंचावर पदार्पण :७ नोव्हेंबर १९८७.स्थळ मुंबई. दीनानाथ नाट्यगृह.
परदेश दौरे : अमेरिका (तेरा वेळा), कॅनडा, सिंगापूर, बँकॉक, दुबई, (दोनदा), मस्कत, बाहरीन (दोनदा), डोहा- कतार, कुवेत (दोनदा), केनिया, इंग्लंड, मलेशिया, जकार्ता, अॅमसस्टरडम
कार्यक्रमांच्या ऑडिओ कासेट्स :एच.एम.व्ही. एनई तिन्ही कार्यक्रमांचे ध्वनिफितींचे दुहेरी संच काढलेत.
फाऊटन म्युझिक कंपनीतर्फे ‘माझी फिल्लमबाजी’ आणि ‘काणेकरी ‘यांच्या व्हीसीडीज प्रकाशित.
अभिप्राय….मते….दाद
जयवंत दळवी उर्फ  ठणठणपाळ : “तुमची ‘कणेकरी’ पाहून मन खरोखर प्रसन्न झाले.उर्फ तुमच्या गप्पाष्टकांना तोड नाही.
कुठे शेवट करता याचा पत्ता लागत नाही. पण प्रत्येक क्षणी हसवता.ही किमया खरोखर फार मोठी आहे.दर क्षणी उत्स्फूर्तेपणे विनोद करून हास्याचा खळखळाट करता ही ताकद विलोभनीय आहे.”
माधव मनोहर :”वक्ता ‘दशसहस्त्रेषू’ म्हणतात अशा दुर्मिळ व्याकत्यापैकी शिरीष कणेकर एक होत. परिणामकारक वक्तृत्वची देणगी त्यांना सहजप्राप्त झालेली दिसते. त्यांच्या अमोघ वक्तृतावत पुन्हा अभिनयचा एक नाटकी बाज आहे. ‘फिल्लमबाजी’च्या निवेदनाला पोषक असा,हसा,परिहास,उपहास,उपरोध,आणि नर्मविनोद हे त्यांच्या धारदार वक्तृत्वाचे प्रमुख विशेष होत.त्याशिवाय त्यांची शब्दांची फेक अचूक असते.अपेक्षित व इष्ट तो परिणाम सहज साधता येईल अशी दुर्मिळ वक्तृत्वशैली काणेकरांना लाभलेली आहे.ती तशी नसती,तर दोनअडीज तास श्रोत्यांना मंत्राने भारल्यागत एकठाय डांबून ठेवणे-आणि ते सुद्धा सतत हसतखिदळत-ही किमया तशी सामान्य नव्हे.” (‘रसरंग’, १६ जानेवारी १९८८)
ज्योतीर्भास्कर जयंत साळगावकर :”फिल्लमबाजी तूफान चालणार हे सांगायला ज्योतिष पहायची काय गरज आहे?”
आशा भोसले : हसून हसून माझा जबडा दुखायला लागला.”
राजेश खन्ना : क्या परफेक्ट टायमिंग है यार तुम्हारा !”
ऋषी कपूर : “एक माणूस एवढ्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतो ही विश्वास उडवणारी गोष्ट आहे.”
अशोक सराफ : “मानलं गुरु !”
लोकसत्ता : ‘कणेकरी फिरक्यांची अफलातून फिल्लमबाजी.’ ‘रंगमंचावरील तूफान फटकेबाजी.’ ‘विषयांचा हवापालट घडवणारी ‘कणेकरी’सफर.’
महाराष्ट्र टाइम्स :’गाडगेबाबांच्या शैलीत रंगले ‘फिल्लमबाजी ‘चे आख्यान.’ ‘जीवनदर्शी तितकाच हास्यकारी कणेकरी.’
सामना :’कणाकणाने खुलणारी कणेकरी.’
The Daily :’Journalist,Shireesh kanekar, has literally found his platform.’
Mid-Day :\A laugh riot.’
Free Press Journal :’A rewarding experience studded with insightful comments delivered   With infectious liveliness.’
Times of india :‘He answers perfectly to Sir John Guilgud’s description of a good actor.
Tense in the wings,a trifle nervous.But when Shirish kanekar shuffles Into the floodlight,the stage is set to showcase the world of glycerine and glamour,grase and ‘gaajar ka halwa’.
शिरीष काणेकर यांची ग्रंथसंपदा 
   यांदो की बारात  गाये चला जा  पुन्हा यांदो की बारात ‘
   एकला बोलो रे   गोतावळा वेचक शिरीष कणेकर
   सुरपारंब्या   शिणेमा डॉट कॉम डोंलरच्या देशा
   साखरफुटाणे    गोली  मार भेजेमे           माझी फिल्लम बाजी
   लगाव बत्ती   डॉ.कणेकरांचा मुलगा मनमुराद
   मखलाशी   नानकटाई   खटल आणि खटला
   चापटपोळी   फटकेबाजी मेतकूट
   कणेकरायण    तिकडमबाजी आंबटचिंबट
   मोतिया    चंची   कट्टा
खालील पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत व त्यांच्या नवीन आवृत्याही येणार नाहीत.त्यातील वेचक व कालबाह्य न ठरलेला मजकूर अन्य पुस्तकात घेतलेला आहे.
क्रिकेट-वेध
फिल्लमबाजी
शिरिषासन
पुन्हा शिरीषासन
रहस्यवल्ली
कणेकरी
चहाटळकी
इरसालकी
चापलूसी
ते साठ दिवस
नट बोलट बोलपट

Shirish Kanekar : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरीष कणेकर यांची आज सकाळी प्रकृती खालावली. यानंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिरीष कणेकर यांच्या निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
पत्रकार,चित्रपट व क्रिकेट समीक्षक,ललित लेखक,एकपात्री कलाकार अशी ओळख असलेल्या शिरीष कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी पुण्यात झाला. रायगड जिल्ह्यातील पेण हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठात कायद्याची पदवी घेतली. इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी यासाठी शिरीष कणेकरांनी काम केले.
सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचे लेखन प्रसिद्ध होते. माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तके आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले. यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, कणेकरी, लगाव बत्ती, आसपास, मेतकूट, चित्ररुप, फिल्लमबाजी, कल्चर व्हल्चर या नावांनी त्यांनी स्तंभलेखन केले.
शिरीष कणेकर यांचा अल्पपरिचय
पत्रकार,चित्रपट व क्रिकेट समीक्षक,ललित लेखक,एकपात्री कलाकार
नाव :शिरीष मधुकर कणेकर
जन्म :६ जून १९४३,पुणे (महाराष्ट्र)
मूळ गाव :पेण,जिल्हा रायगड
शिक्षण :मुंबई विद्यापीठाची कायद्याची पदवी
वृत्तपत्रीय कारकीर्द :इंडियन एक्सप्रेस (१९६८-१९८०),’डेली'(१९८०-१९८२),’फ्री प्रेस जर्नल ‘(१९८२- १९८५),’सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सि ‘(१९८५-१९८९)यांत इंग्रजी पत्रकारिता.
सद्य व्यवसाय :मुक्त पत्रकारिता,मराठीतून स्तंभलेखन.एकपत्री कार्यक्रम.
पहिले लेखन :जोर्जं गन :एक लहरी फलंदाज (‘अमृत’,जानेवारी १९६४)
ग्रंथलेखन क्रिकेट :’क्रिकेट-वेध ‘(प्रथम प्रकाशन १९७७).दुसरी आवृत्ती संपली.
हिन्दी चित्रपट संगीत :’गाये चला जा ‘(प्रथम प्रकाशन १९७८).पाचवी सुधारित आवृत्ती.
हिन्दी चित्रपट :’यादो की बारात'(प्रथम प्रकाशन १९८५)
व्यवसायिकाची
व्यक्तिचित्रे :तिसरी आवृत्ती. पुन्हा यादों की बारात ,(प्रथम प्रकाशन १९९५)दुसरी आवृत्ती.
हिन्दी चित्रपटाविषयी :’शिरिषासन ‘(प्रथम प्रकाशन १९८४)आवृत्ती संपली.
‘फिल्लमबाजी'(प्र.प्र. १९८०)आवृत्ती संपली.
      ‘पुन्हा शिरिषासन ‘(प्र.प्र. १९८५)आवृत्ती संपली.
‘कणेकरी’ (प्रथम प्रकाशन १९९१)आवृत्ती संपली.
‘नट बोलट बोलपट’ (प्रथम प्रकाशन १९९९ )
‘शिनेमा डॉट कॉम ‘(प्रथम प्रकाशन २००१).दुसरी आवृत्ती २००७
रहस्यकथा :’रहस्यवल्ली’ (प्रथम प्रकाशन १९८६) आवृत्ती संपली.
ललित :’चाहटळणी’ (प्र.प्र.१९९५) तिसरी आवृत्ती.
‘इरसालकी’ (प्रथम प्रकाशन १९९७)दुसरी आवृत्ती.
‘चापलूसरकी’ (प्रथम प्रकाशन १९९८) दुसरी आवृत्ती.
‘साखरफुटाणे’ (प्रथम प्रकाशन २००१)
‘गोली मार भेजेमें'(प्रथम प्रकाशन २००१) (दुसरी आवृत्ती )
‘सुरपारंब्या’ (प्रथम प्रकाशन २००१)
‘लगाव बत्ती’ (प्रथम प्रकाशन २००२) (दुसरी आवृत्ती २००७)
डॉ. काणेकरांचा मुलगा (प्रथम प्रकाशन २००३) (दुसरि आवृत्ती २००९)
मखलाशी (प्रथम प्रकाशन २००४ )
मनमुराद (प्रथम प्रकाशन २००४, दुसरी आवृत्ती २०११)
नानकटाई (प्रथम प्रकाशन २००५)
खटल आणि खटला (प्रथम प्रकाशन २००५)
चापटपोळी (प्रथम प्रकाशन२००६)
मेतकूट (प्रथम प्रकाशन २००७)
फटकेबाजी (प्रथम प्रकाशन २००६,दुसरी आवृत्ती २०१० )
तिकडमबाजी (प्रथम प्रकाशन २००९)
आंबटचिंबट (प्रथम प्रकाशन २०१०)
मोतिया (प्रथम प्रकाशन २०१०)
चंची (प्रथम प्रकाशन २०११)
कट्टा (प्रथम प्रकाशन २०१२)
एककेचाळीस (प्रथम प्रकाशन २९१५)
टिवल्या बावल्या (प्रथम प्रकाशन २०१६)
कुरापत (प्रथम प्रकाशन २०१७)
यारदोस्त (प्रथम प्रकाशन २०१८)
प्रवासवर्णन :’ते साठ दिवस’ (प्रथम प्रकाशन १९९७)
  ‘डॉलरच्या देशा’ (प्रथम प्रकाशन २००२)(चौथी आवृत्ती)
एकपात्रीचे अनुभव कथन :’एकला बोलो रे’ (प्रथम प्रकाशन १९९७) (तिसरी आवृत्ती)
एकपात्रीची संहिता :माझी फिल्लमबाजी’ (प्रथम प्रकाशन २००२)
व्यक्तिचित्रे :’गोतावळा’ (प्रथम प्रकाशन २०००) (तिसरी आवृत्ती)
समग्र संकलन :’वेचक शिरीष कणेकर’ (प्रथम प्रकाशन २००१) दुसरी आवृत्ती
कणेकरायण (प्रथम प्रकाशन २००८)
भाषांतरे :गाये चला जा’ व ‘यादों की बारात’ यांची गुजराथी भाषांतरे प्रसिद्ध, अनेक लेखांची
गुजराथी व हिंदीत भाषांतरे. ‘यादों की बारात’चे इंग्रजीतून ‘वेबसाइट’वर प्रसारण.
पारितोषिके :मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै.विद्याधार गोखले ललित साहित्य
पुरस्कार’१९९९.नाशिक नगरपालिका वाचानालयातर्फे ‘सुरपारंब्या’ या संग्रहास सर्वोत्कृष्ट
विनोदी वाड्मयाचा पुरस्कार.’लगाव बत्ती’ या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा
उत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा चि.वि.जोशी पुरस्कार.
स्तंभलेखन
लोकसत्ता :यादों की बारात,शिरिषासन,सिनेमाबाजी,गुद्दे आणि गुदगुल्या,चहाटळकी, सुरपारंब्या
महाराष्ट्र टाइम्स :सिनेमागिरी,लगाव बत्ती
लोक्मत :कणेकरी
सामना :कणेकरी, चिमटे आणि गळगुच्चे, मोतिया,टिवल्या बावल्या
पुढारी :चिमटे आणि गालगुच्चे
साप्ताहिक मनोहर :आसपास
साप्ताहिक लोकप्रभा :कणेकरी,मेतकूट
साप्ताहिक प्रभंजन :चित्ररूप
साप्ताहिक चित्रानंद :शिरीषासन
पाक्षिक चंदेरी :कणेकरी
सिंडिकेटेड कॉलम :फिल्लमबाजी
The Daily :culture vulture
रंगमंचीय कारकीर्द :भारतीय रंगभूमीवर ‘स्टँड अप कॉमेडी’ प्रथम आणली. ‘माझी फिल्लमबाजी’,’फटकेबाजी’ व ‘कणेकरी’ या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन,दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण केले.
‘या कातरवेळी ‘या कार्यक्रमाचे लेखन व सादरीकरण.आजवर केवळ परदेशात प्रयोग.
रंगमंचावर पदार्पण :७ नोव्हेंबर १९८७.स्थळ मुंबई. दीनानाथ नाट्यगृह.
परदेश दौरे :अमेरिका (तेरा वेळा),कॅनडा,सिंगापूर,बँकॉक,दुबई,(दोनदा),मस्कत,बाहरीन(दोनदा),डोहा-
कतार,कुवेत(दोनदा),केनिया,इंग्लंड,मलेशिया,जकार्ता,अॅमसस्टरडम
कार्यक्रमांच्या
ऑडिओ कासेट्स :एच.एम.व्ही. एनई तिन्ही कार्यक्रमांचे ध्वनिफितींचे दुहेरी संच काढलेत.
फाऊटन म्युझिक कंपनीतर्फे ‘माझी फिल्लमबाजी’ आणि ‘काणेकरी ‘यांच्या व्हीसीडीज
प्रकाशित.
अभिप्राय….मते….दाद
जयवंत दळवी उर्फ            :”तुमची ‘कणेकरी’ पाहून मन खरोखर प्रसन्न झाले.उर्फ तुमच्या गप्पाष्टकांना तोड नाही.
ठणठणपाळ      कुठे शेवट करता याचा पत्ता लागत नाही. पण प्रत्येक क्षणी हसवता.ही किमया खरोखर फार मोठी आहे.दर क्षणी उत्स्फूर्तेपणे विनोद करून हास्याचा खळखळाट करता ही ताकद विलोभनीय आहे.”
माधव मनोहर :”वक्ता ‘दशसहस्त्रेषू’ म्हणतात अशा दुर्मिळ व्याकत्यापैकी शिरीष कणेकर एक होत.
परिणामकारक वक्तृत्वची देणगी त्यांना सहजप्राप्त झालेली दिसते.त्यांच्या अमोघ वक्तृतावत पुन्हा अभिनयचा एक नाटकी बाज आहे. ‘फिल्लमबाजी’च्या निवेदनाला पोषक असा,हसा,परिहास,उपहास,उपरोध,आणि नर्मविनोद हे त्यांच्या धारदार वक्तृत्वाचे प्रमुख विशेष होत.त्याशिवाय त्यांची शब्दांची फेक अचूक असते.अपेक्षित व इष्ट तो परिणाम सहज साधता येईल अशी दुर्मिळ वक्तृत्वशैली काणेकरांना लाभलेली आहे.ती तशी नसती,तर दोनअडीज तास श्रोत्यांना मंत्राने भारल्यागत एकठाय डांबून ठेवणे-आणि ते सुद्धा सतत हसतखिदळत-ही किमया तशी सामान्य नव्हे.” (‘रसरंग’, १६ जानेवारी १९८८)
ज्योतीर्भास्कर जयंत :”फिल्लमबाजी तूफान चालणार हे सांगायला ज्योतिष पहायची काय गरज आहे?”
साळगावकर
आशा भोसले : हसून हसून माझा जबडा दुखायला लागला.”
राजेश खन्ना : क्या परफेक्ट टायमिंग है यार तुम्हारा !”
ऋषी कपूर : “एक माणूस एवढ्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतो ही विश्वास उडवणारी गोष्ट आहे.”
अशोक सराफ : “मानलं गुरु !”
लोकसत्ता : ‘कणेकरी फिरक्यांची अफलातून फिल्लमबाजी.’
‘रंगमंचावरील तूफान फटकेबाजी.’
‘विषयांचा हवापालट घडवणारी ‘कणेकरी’सफर.’
महाराष्ट्र टाइम्स :’गाडगेबाबांच्या शैलीत रंगले ‘फिल्लमबाजी ‘चे आख्यान.’
‘जीवनदर्शी तितकाच हास्यकारी कणेकरी.’
सामना :’कणाकणाने खुलणारी कणेकरी.’
The Daily :’Journalist,Shireesh kanekar, has literally found his platform.’
Mid-Day :\A laugh riot.’
Free Press Journal :’A rewarding experience studded with insightful comments delivered
With infectious liveliness.’
Times of india :’He answers perfectly to Sir John Guilgud’s description of a good actor.
Tense in the wings,a trifle nervous.But when Shirish kanekar shuffles
Into the floodlight,the stage is set to showcase the world of glycerine
and glamour,grase and ‘gaajar ka halwa’.
शिरीष काणेकर यांची ग्रंथसंपदा
   यांदो की बारात  गाये चला जा  पुन्हा यांदो की बारात ‘
   एकला बोलो रे   गोतावळा वेचक शिरीष कणेकर
   सुरपारंब्या   शिणेमा डॉट कॉम डोंलरच्या देशा
   साखरफुटाणे    गोली  मार भेजेमे           माझी फिल्लम बाजी
   लगाव बत्ती   डॉ.कणेकरांचा मुलगा मनमुराद
   मखलाशी   नानकटाई   खटल आणि खटला
   चापटपोळी   फटकेबाजी मेतकूट
   कणेकरायण    तिकडमबाजी आंबटचिंबट
   मोतिया    चंची   कट्टा
खालील पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत व त्यांच्या नवीन आवृत्याही येणार नाहीत.त्यातील वेचक व कालबाह्य न ठरलेला मजकूर अन्य पुस्तकात घेतलेला आहे.
क्रिकेट-वेध
फिल्लमबाजी
शिरिषासन
पुन्हा शिरीषासन
रहस्यवल्ली
कणेकरी
चहाटळकी
इरसालकी
चापलूसी
ते साठ दिवस
नट बोलट बोलपट

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -