नाशिक : राज ठाकरे (Raj Thackarey) यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackarey) आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी काल अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Highway) प्रवास करत असताना सिन्नर येथील नाक्यावर त्यांचा ताफा अर्धा तास थांबवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. टोल नाका कर्मचाऱ्यांच्या अरेरावी तसेच गैरवर्तणुकीमुळे ही तोडफोड केल्याचे मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सांगितले. नाशिकला पोहोचल्यानंतर अमित ठाकरेंना या तोडफोडीबद्दल कळलं, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेवर ‘साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक ॲड झाला’, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी स्मितहास्य करत दिली आहे.
ते म्हणाले, रात्री साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर दिवसभर बरोबर असलेल्या सिक्युरिटीला शिर्डीलाच थांबवून मी माझ्या कामानिमित्त नाशिकला निघालो. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे जाताना सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवण्यात आली. मला नाशिकला काम असल्याने मी नाशिककडे निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीलाच थांबायला सांगितलं. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवण्यात आली.
पुढे ते म्हणाले, गाडीला फास्टॅग असतानाही टोलनाक्याचा रॉड खाली आला. तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं असता आमचे काही इश्यूज आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे, असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर ते म्हणाले, साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक ॲड झाला.
दरम्यान याबाबत पोलिसांनी माहिती देताना म्हटलं की, “अमित ठाकरे यांचा फास्टॅग ब्लॅकलिस्टेड झाला होता. पण टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना अमित ठाकरेंची गाडी असल्याचं लक्षात आलं नाही. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते टोलनाक्यावर जमले. पण पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून कार्यकर्त्यांना प्रकार नीट समजावून सांगितला. त्यानंतर कार्यकर्ते कोणताही गोंधळ न घालता तिथून निघाले. टोलनाक्याच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आम्ही त्यानंतर इथे दोन तास होतो. पण अचानक रात्री अडीच वाजता काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा टोलनाक्यावर आलो. पण सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. कोणत्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…