संतोष रांजणकर
मुरूड : मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी केली आहे. या जमिनीवर १९ बंगल्यांबाबत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये एफआयआर क्रमांक २६ नुसार गुन्हा (Cheating) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला असता आणखी स्फोटक माहिती उघडकीस आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत हेतुपुर्वक चुकीच्या नोंदी व बनावट दस्त तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याने रेवदंडा पोलीस ठाण्यात मुरूड गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी काल पुन्हा एक फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की, मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत दिनांक ०१/०१/२००५ ते दि. ३१/१२/२०२२ दरम्यान मौजे कोर्लई ग्रामपंचायत येथे एकूण १३ आरोपित सर्व रा. मुरुड ता. मुरुड यापैकी ग्रामसेवक दिलीप तुरे, ए. आर. पाटील, अनिल चवरकर, विनोद मिंडे, ज्ञानेश्वर पातेरे, डी. डी. वेटकोळी, वेदिका म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे या आठ ग्रामसेवक सहित तत्कालीन सरपंच भगीरथ पाटील, प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, पिटकूर यांनी वैयक्तिक लाभ होणे करीता आपसांत संगनमत करून कोर्लई ग्रामपंचायतीचे गावठाण मिळकतीत व गावठण क्षेत्राबाहेरील मिळकतीवर नियमबाहय बांधकाम परवानगी व दुरूस्ती परवानगी देवून ग्रामपंचायत मिळकत नोंद वहीत त्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी व विहीत प्रक्रीयेचा अवलंब न करता परस्पर कर आकारणी केली तसेच काही मिळकतींवर प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम नसताना ग्रामपंचायतीकडून मिळकत कर आकारणी करून हेतुपुर्वक चुकीच्या नोंदी व बनावट दस्त तयार करून शासनाची फसवणूक केली तसेच लोकसेवक म्हणून ग्रामपंचायत मिळकतींचे लेखांचे जतन करण्याची जबाबदारी असताना सुध्दा सदरचे महत्वाचे दस्तऐवज आरोपीतांनी पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने नाहीसे केले.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. – 147/2023 भा.दं.वि.क. 420, 465, 466, 468, 204, 166, 167, 218, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे हे करीत आहेत.
या प्रकरणाबाबत भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे गुन्हा दाखल करण्याबाबत प्रयत्न करीत होते. संगिता लक्ष्मण भांगरे यांच्या तक्रारीनुसार कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी केली आहे. ही जमीन आर्किटेक्ट कै अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली आहे. या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी केला आहे. याबाबत कोर्लई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमय्या पाठपुरावा करीत होते. रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी कागदपत्रात छेडछाड केल्याचे सोमय्या यांचा आरोप आहे. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक श्रीमती देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात फसवणूक, संगनमत, १९ बंगलोचे रेकॉर्ड मध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच एफआयआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये तत्कालीन तीन ग्रामसेवक, चार सरपंच आणि तत्कालीन सदस्य याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला असता ही गंभीर बाब निदर्शनास आल्याने या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…