Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीfitness : करीनापासून दीपिकासारख्या अनेक सेलिब्रिटींना 'कोण' ठेवतात फिट?

fitness : करीनापासून दीपिकासारख्या अनेक सेलिब्रिटींना ‘कोण’ ठेवतात फिट?

मुंबई : फिटनेस (fitness) आणि वेलनेसच्या जगात सेलिब्रिटी ना फिट ठेवण्यासाठी ही खास योगा प्रशिक्षक अनेक बड्या कलाकारांना फिट ठेवते. कलाकारांची लाईफ स्टाईल बघता त्यांना रोजच्या जीवनात फिट राहावं लागतं आणि यासाठी त्यांना ते ट्रेन करतात. केवळ सेलिब्रिटींना नाही तर अनेकांना फिटनेसची आवड लावणारी या आहेत खास योगा प्रशिक्षक!

रुपल सिद्धपुरा फारिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Rupal Sidhpura Faria (@rupal_sidh)


रुपल सिद्धपुरा फारिया ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी योगा प्रशिक्षक आणि दूरदर्शी फिटनेस ट्रेनर आहे. फिट राहण्यासाठी आणि जगण्यासाठी त्यांनी आजवर अनेक कलाकारांना ट्रेन केलं आहे. तिच्या फिटनेस कौशल्याने राधिका आपटे, अनुराग कश्यप, झोया अख्तर, सैफ अली खान, रितेश देशमुख आणि श्वेता बच्चन यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांना फिट ठेवलं आहे. विशेष म्हणजे करीना कपूर, सोहा अली खान आणि सुरवीन चावला यांच्यासह गरोदर स्त्रियांसाठी रुपल ने खास प्रशिक्षण दिलं आणि ती या क्षेत्रातील एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळखली जाते.

यास्मिन कराचीवाला


यास्मिन कराचीवाला हे फिटनेस इंडस्ट्रीतील एक प्रमुख नाव आहे जे तिच्या पिलायेट आणि योगामधील निपुणतेसाठी ओळखले जाते. दोन दशकांहून अधिक अनुभवासह, यास्मिनने आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांसारख्या ए-लिस्ट बॉलीवूड स्टार्ससोबत काम केले आहे.

अंशुका परवानी

 

View this post on Instagram

 

A post shared by ANSHUKA YOGA (@anshukayoga)


अंशुका परवानी ही प्रसिद्ध योग प्रशिक्षक आहे हिने योग समुदायात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अंशुकाच्या क्लायंट लिस्टमध्ये दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे या नावांचा समावेश आहे.

नम्रता पुरोहित

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Purohit (@namratapurohit)


नम्रता पुरोहित ही एक तरुण आणि योग प्रशिक्षक आहे जी तिच्या Pilates मधील कौशल्यासाठी सर्वत्र ओळखली जाते. नम्रता ने सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांसारख्या तरुण सेलिब्रिटी ना ट्रेन केलं.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -