Ek Hota Malin Marathi Movie : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... ३० जुलै २०१४ ची ती काळरात्र आजही महाराष्ट्र विसरलेला नाही. पावसासाठी वरुणराजाची प्रार्थना करून ग्रामस्थ शांत झोपी गेले; मात्र पहाट होण्यापूर्वीच निसर्गाने रौद्ररूप धारण केले. डोंगर कोसळला आणि काही क्षणांत संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, शेकडो स्वप्ने चिरडली गेली आणि संपूर्ण राज्य हादरून गेले. याच हृदयद्रावक सत्यघटनेवर आधारित 'एक होतं माळीण' हा मराठी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. टीझर पाहताना त्या भीषण घटनेची भयावहता पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभी राहते.
Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. या महिन्यात अनेक हिंदी ...
अंगावर शहारे आणणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची वास्तवाशी असलेली जवळीक. दिग्दर्शक राजू राणे यांनी माळीण गावातील वाचलेल्या ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या आठवणी, अनुभव आणि वेदना जाणून घेतल्यानंतरच चित्रपटाचे कथानक आकाराला आले. त्यामुळे पडद्यावर दिसणारा प्रत्येक प्रसंग अधिक जिवंत आणि भावनिक वाटतो. चित्रपटाचे चित्रीकरण बदलापूर येथे करण्यात आले असून, माळीण गावाचा हुबेहूब सेट उभारण्यासाठी कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. गावातील घरे, रस्ते, परिसर आणि निसर्गाचे वातावरण इतक्या वास्तववादी पद्धतीने उभे करण्यात आले आहे की, टीझर पाहताना आपण त्या काळात पोहोचल्याचा भास होतो.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सुरुवातीला शांत, सुखी आणि साधं गावजीवन दिसतं. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद, निसर्गाशी असलेलं नातं आणि पावसाची प्रतीक्षा... पण काही क्षणांतच सर्वकाही बदलून जातं. मुसळधार पाऊस, डोंगर खचण्याचा आवाज, भीतीने ओरडणारी माणसं आणि काही क्षणांत मातीखाली गाडलं जाणारं संपूर्ण गाव... हे दृश्य अक्षरशः अंगावर शहारे आणतात.
Akanksha Chamola : टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 'लॉक अप २'च्या नव्या भागात ...
ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती
ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या (Dream Dot Creation Productions) बॅनरखाली संतोष जगन्नाथ म्हात्रे (Santosh Jagannath Mhatre) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्तात्रय गायकर आणि राजू राणे हे सहनिर्माते आहेत. तर रॅन स्टुडिओज प्रोडक्शनच्या नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे आणि राजू राणे यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा आणि पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सत्यघटनेवर आधारित चित्रपट साकारताना कोणतीही अतिशयोक्ती न करता वास्तव प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे.
Ashok Saraf & Nivedita Saraf Anniversary : मराठी कलाविश्वात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला आज ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तुम्हांला ...
चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका अत्यंत वास्तववादी पद्धतीने साकारल्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटाचे छायांकन राजा फडतरे यांनी केले असून युवराज गोंगले यांनी गीतलेखनासह संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला अधिक भावनिक बनवतात. कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर यांनी केले असून व्हीएफएक्सची जबाबदारी रहमान अब्दुल्ला यांनी सांभाळली आहे. महेश भारंबे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
'एक होतं माळीण' हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट नसून, महाराष्ट्राच्या इतिहासातील एका वेदनादायी सत्यघटनेची भावनिक नोंद आहे. एका रात्रीत सर्वस्व गमावलेल्या लोकांच्या संघर्षाची, वेदनेची आणि जगण्यासाठीच्या लढ्याची ही कथा २४ जुलैपासून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.



