Covid Scam : वाह रे शिंदे-फडणवीस सरकार! कारवाईच्या भीतीने आयएएस अधिका-यांची धावाधाव!

Share

ईडीच्या कारवाईने आयएएस लॉबी अस्वस्थ; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार!

मुंबई : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या घरावर ईडीने (ed) छापा टाकल्याने भ्रष्ट आयएएस अधिका-यांची भीतीने झोप उडाली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. (Shinde-Fadanavis government)

जैस्वाल यांच्यावर ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केली, ती अयोग्य होती. एकदम त्यांच्या घरी धडक मारणेही योग्य नव्हते, अशी या अधिकाऱ्यांची भूमिका आहे.

एखाद्या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याचे नाव आल्यानंतर चौकशी करणे याला आमचा विरोध नाही; पण ते आरोपी आहेतच अशा पद्धतीने त्यांच्या घरी काही तास ईडीच्या पथकाने चौकशी करणे, कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरणे योग्य नाही, अशी भावना या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्याचे समजते. परंतु जर जैस्वाल चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी; पण त्यावेळी परिस्थिती काय होती आणि त्यातून काय निर्णय घेण्यात आला, याचा विचार व्हायला हवा. एखाद्याला लक्ष्य करून त्याच्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सांगितले.

या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनी त्यांचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकूनही घेतले आणि त्यानंतर मात्र फडणवीसांनी जैस्वाल यांच्या कारनाम्यांबाबत खुलासावार माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने त्या सर्वांची तोंडं पहाण्यासारखी झाली होती.

कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रं सापडली

कोविड काळात संजीव जैस्वाल मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत होते. कोविड सेंटर घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्याने इडीने अधिक चौकशी करु खात्री केल्यानंतरच त्यांच्या घरी छापा टाकला. या छापेमारीत संजीव जैस्वाल यांच्या घरी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. जैस्वाल यांच्या पत्नीच्या नावे तब्बल ३४ कोटींची संपत्ती आहे. यामध्ये १५ कोटी रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत. इतकेच नव्हे तर मुंबईतल्या मोक्याच्या जागी त्यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. मढ आयलंड येथे अर्धा एकरचा भूखंड आहे. काही फ्लॅट्स आणि इतर मालमत्ताही आहेत.

दरम्यान, पत्नीच्या नावे असलेली संपत्ती ही तिच्या माहेरून मिळाली असल्याचा दावा जैस्वाल करत आहेत. पण तो दावा किती खरा आहे, हे चौकशीनंतरच कळेल. जैस्वाल व्यतिरिक्त, ईडीने महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार आणि जे केंद्रीय खरेदी विभागात होते, ज्यांनी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि इतर साहित्य पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी होते, अशा बीएमसीच्या वैद्यकीय अधिका-यांवरही छापे टाकले आहेत.

या सगळ्या प्रकरणांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याचे उघडकीस आले आहे. करारासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकल्याची माहिती कंपनीने लपविली आणि १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या या कोविड घोटाळ्यात ३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या चौकशीत आणखी कोट्यवधी रुपयांची प्रकरणं उघडकीस येणार असल्याने आयएएस लॉबी अस्वस्थ झाली असून भ्रष्ट अधिका-यांची भीतीने गाळण उडाली आहे.

आता कारवाई टाळण्यासाठी अखेरचा उपाय म्हणून हे अधिकारी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही भेटणार असल्याचे समजते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

1 hour ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

2 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

2 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

3 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

3 hours ago