Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखNitesh Rane : आ. नितेश नारायण राणे भाजपचा हुकमी एक्का!

Nitesh Rane : आ. नितेश नारायण राणे भाजपचा हुकमी एक्का!

  • समीर नलावडे : मा. नगराध्यक्ष, कणकवली

आ. नितेश साहेब यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त मला भावलेले बदलते नितेश साहेब याबद्दल माझं मत.

माझ्या नगराध्यक्षपदाच्या प्रवासात भक्कम पाठिंबा लाभलेले कवच म्हणजे नितेश साहेब. आज कणकवली नगरपंचायत खूप भरीव काम करू शकली, याच श्रेय कुणाला जाईल, तर आ. नितेश साहेब यांनाच. अगदी निवडणूक जिंकणे ते पुढे कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे काम कुणी खंबीर पाठीशी असल्याशिवाय पूर्ण होत नाही. मी स्वत: खूप भाग्यवान आहे की, माझ्या पूर्ण यशस्वी कार्यकाळात आ. नितेश साहेब माझ्यासोबत खंबीरपणे पाठीशी होते. अभ्यासपूर्ण नेता सोबत असेल, तर तुम्ही यशदायी होता. माझ्या बाबतीत हेच झाले. योग्य निर्णय घेत नितेश राणे यांनी दिलेली सर्व जबाबदारी मी पार पाडली आणि यशस्वी नगराध्यक्ष झालो. हायवेचे प्रश्न, शिवाजी महाराजांचा पुतळा, ठाकरे सरकारच्या काळातील अपुरा नगरपंचायत निधी, क्रीडा संकुल, रिंग रोड अनेक अडथळ्यांवर मात केली. याचे श्रेय मी फक्त आ. नितेश साहेब यांनाच देईन.

आता तर युतीचे सरकार आले आहे. साहेबांनी निधीचा सगळा बॅकलॉग भरून काढला आणि आज महाराष्ट्रात प्रमुख नेतृत्वातील एक नाव नितेश राणे यांचे आहे. सरकारमध्ये कोणतेही मंत्रीपद नसतानाही महाराष्ट्राभर या नावाचा दबदबा निर्माण होणे हे काम साहेबांचे.

प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी आज ओळख त्यांची निर्माण झाली आहे. राज्यात कुठेही लव्ह जिहाद घटना घडत असेल, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देईल, असे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल नाव म्हणजे आ. नितेश राणे साहेबच. नितेश राणे पोहोचेले म्हणजे प्रश्न सुटलाच समजा, ही खात्रीच अख्ख्या महाराष्ट्राला झाली आहे.

महाराष्ट्रातील मराठा आंदोलन झाले त्यातही हिरिरीने पुढाकार घेणारे नेतृत्व होते, ते म्हणजे आ. नितेश राणे साहेब. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे ही त्यांच्या कामाची ओळख.

उद्ध्वस्त झालेल्या उबाठाच्या वाचाळवीरांना काही केल्या लगाम घालणे कठीण जात होते. अनेक शिंदे गटाचे नेते सुद्धा दमले. प्रदेश भाजप आपला हुकमी एक्का बाहेर काढला. आली जबाबदारी नितेश साहेबांवर. दिलेली जबाबदारी पाळणे हा शब्द राणेंचा, तो त्यांनी सिद्ध केला. आज संजय राऊतसारखे वाचाळवीर वैफल्यग्रस्त होत थुंकायला लागलेत, इतका दबाव त्यांनी नितेश साहेबांच्या प्रत्युत्तरादाखल घेतला आहे. उरली-सुरली शिल्लक सेना या कोकणच्या धडाडणाऱ्या तोफेच्या तोंडी देऊन नष्ट होईल.

अल्पावधीतच महाराष्ट्रातील हिंदूंच्या मनातील राजा झालेल्या आमच्या आमदार साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -