नाशिक : नाशिकमध्ये १३ माजी नगरसेवकांनी १५ डिसेंबर २०२२ रोजी ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. या प्रवेशाचे मूळ कारण असलेला २६ कोटींचा विशेष निधी अखेर माजी नगरसेवकांच्या प्रभागाला नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik Municipal Office) मंजूर करण्यात आला. राज्य सरकारकडून या निधीसाठी मान्यता मिळवण्यात आली. यात प्रत्येक माजी नगरसेवकाच्या प्रभागात २ कोटींची विकासकामं करण्यात येणार आहेत.
आगामी निवडणुकींचे वारे वाहू लागल्याने प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. त्यात शिवसेनेने देखील नवी खेळी खेळत आपला पक्ष अधिक बळकट करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या विकासासाठी शिवसेनेचा प्रत्येक घटक कार्यरत असून १३ माजी नगरसेवकांना आपापल्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधी दिला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात दिवसागणिक शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग ७ : जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, प्रभाग २४ : महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, प्रभाग ३ : पूनम मोगरे, प्रभाग १९ : जयश्री खर्जुल, प्रभाग २१ : सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, प्रताप मेहरोलिया, प्रभाग २५ : श्यामकुमार साबळे, प्रभाग २६ : हर्षदा गायकर, प्रभाग २७ : चंद्रकांत खाडे, प्रभाग २८ : सुवर्णा मटाले, प्रभाग ३१ : सुदाम डेमसे, संगीता जाधव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी शिवसेनेत बंड करुन नवी शिवसेना स्थापन केल्यापासून शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जोरदार इनकमिंग (Incoming) सुरु आहे. मात्र शिवसेना सोडून कोणीही गेलेलं नाही. यातच नाशिकच्या १३ माजी नगरसेवकांनीदेखील डिसेंबर महिन्यात शिवसेनेत प्रवेश केला व प्रलंबित असलेला २६ कोटींचा विशेष निधी अखेर मंजूर करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकींच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर शिवसेनेचं संख्याबळ वाढत चाललं आहे आणि याचा भाजप-शिवसेना युतीला प्रचंड फायदा होणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…