हरियाणा : गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला म्हणून दहावीत शिकणाऱ्या बहिणीने आपल्याच छोट्या भावाची गळा आवळून हत्या केली.
हरियाणामधील फरिदाबादमध्ये रहाणा-या या कुटूंबातील आईवडील दोघेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. मंगळवारी ते दोघेही कामावरून घरी परतले तेव्हा त्यांचा पाचवीत शिकणारा १२ वर्षांचा मुलगा बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच फरिदाबादच्या बल्लभगढ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मुलाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांला आला. पोलिसांनी दहावीत शिकणा-या १५ वर्षांच्या मुलगीची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मुलीने सांगितलेले कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
चौकशीत मुलीने सांगितले की, आपल्या छोट्या भावाला आई वडिलांकडून अधिक प्रेम आणि आपुलकी मिळते त्याचा द्वेष मनात होता. तसेच गेम खेळण्यासाठी भावाकडे मोबाईल मागितला परंतू त्याने तो देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तिने लहान भावाचा गळा आवळून खून केला.
ही धक्कादायक घटना फरिदाबाद येथे घडली असली तरी देशातील प्रत्येक आई-वडिलांना आणि पालकांना विचार करायला लावणारी आहे.