केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रेल्वे मंत्र्यांशी कोकण रेल्वेतील प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय सुक्ष्म, मध्यम व लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या समेवत बैठक घेवून कोकणाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर चर्चा केली. या चर्चेतून गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले आहे. या संदर्भात नारायण राणे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.





गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची बुकींग आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये फुल झाली होती. या तिकीट बुकींगमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप कोकणवासियांकडून करण्यात आला होता. त्यासंदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिले. तसेच अतिरिक्त हॉलीडे स्पशेल ट्रेन सोडण्याबाबत योग्य तो काढणार असल्याचे वैष्णव म्हणाले.


तुतारी एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्टेशनवर थांबविण्यात येईल असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. तसेच कोकण रेल्वे वरील वंदे भारत सेवेला कण्कवली येथे थांबा देण्याचा निर्णय झाला असून, कोकणाच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या मिनी टॉप ट्रेन बाबत सकारात्मक चर्चा झाली. पडवे येथील रेल्वेचा अंडरपास बांधण्याच्या प्रस्तावास रेल्वे मंत्र्यांनी मान्यता दिली असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.

Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा