Saturday, December 14, 2024
Homeमहामुंबईआणखी आठ मार्गांवर बेस्टची प्रीमियर बससेवा

आणखी आठ मार्गांवर बेस्टची प्रीमियर बससेवा

नवी मुंबई, अंधेरी, बीकेसी, सीप्ज व कलिना येथील प्रवाशांना लाभ

मुंबई : प्रीमियर बससेवेवरील वाढता प्रतिसाद लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने आणखी आठ बस मार्गांवर चलो प्रीमियर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात नुकत्याच ४० चलो प्रीमियम दाखल झाल्या आहेत. या नव्या बस या प्रीमियर मार्गांवर धावतील.

या बससेवांचा विशेष करून नवी मुंबई, अंधेरी, बीकेसी, सीप्ज व कालिना येथील प्रवाशांना लाभ होणार आहे. नवीन प्रीमियर बस मार्ग एस ११४ खारघर ते बीकेसी, एस ११५ बेलापूर ते बीकेसी, एस ११६ खारघर ते अंधेरी, एस ११७ बेलापूर ते अंधेरी, एस ११८ लोढा अमरा ठाणे ते अंधेरी, एस ११९ कुर्ला ते बीकेसी, एस १२० गुंदवली ते बीकेसी मार्गे कालिना, १२१ अंधेरी ते सीप्ज या मार्गावर धावतील.

‘चलो’तर्फे प्रथम प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बसमधून भरपूर सवलत दिली जाणार असून खारघर व बेलापूर ते बीकेसी मूळ भाडे १३४ रुपये असून प्रथम प्रवास करणाऱ्यास ४५ रुपयांत प्रवास करता येईल. खारघर व बेलापूर ते अंधेरी मूळ भाडे १४९ रुपये असून प्रथम प्रवास करणाऱ्याला पन्नास रुपयांत प्रवास करता येईल. ठाणे ते अंधेरी मूळ भाडे १३४ रुपये असून सवलतीच्या दरात ते ४५ रुपयांना मिळेल. कुर्ला ते बीकेसी मूळ भाडे ३० रुपये असून सवलतीत पंधरा रुपयांत प्रवास करता येईल. कुर्ला ते गुंदवली मूळ भाडे ६८ रुपये असून सवलतीत २५ रुपयांमध्ये, तर अंधेरी ते सोपज मूळ भाडे ३० रुपये असून सवलतीत ते पंधरा रुपयांत करता येईल.

  • कुर्ला ते बीकेसी मूळ भाडे ३० रुपये असून सवलतीत १५ रुपये
  • कुर्ला ते गुंदवली मूळ भाडे ६८ रुपये असून सवलतीत २५ रुपये
  • अंधेरी ते सोपज मूळ भाडे ३० रुपये असून सवलतीत १५ रुपये

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -