Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीगाणी लावण्याच्या किरकोळ कारणावरुन नांदेडमध्ये दोन गटांत वाद

गाणी लावण्याच्या किरकोळ कारणावरुन नांदेडमध्ये दोन गटांत वाद

राज्यात हिंसाचार वाढला

किनवट : अकोल्यातील हरिहरपेठ, नगरमधील शेवगाव आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वरनंतर आता नांदेडमध्येदेखील दंगलसदृश घटना घडली आहे. नांदेडमधील किनवट येथे हळदी समारंभात डीजे लावण्याच्या अत्यंत किरकोळ कारणावरुन दोन गटांत हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

१४ मे ला रात्री किनवटमधील गंगापूर येथे हळदी समारंभादरम्यान डीजे लावला होता. तेवढ्यात इस्लामपुरा येथील दहा जण तिथे आले. त्यांनी गाणी वाजवण्यावर आक्षेप घेतला व डीजे बंद करायला सांगितला. डीजे लावणार्‍यांनी नकार दिल्यामुळे या दोन्ही गटांमध्ये दगडफेक व हाणामारी सुरु झाली. हे प्रकरण एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेले. किनवट पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

यासंबंधी पोलिसांनी एका गटातील ७ तर दुसर्‍या गटातील ४ अशा ११ जणांना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता परिस्थिती निवळली असून कोणीही अफवा पसरवू नये व शांतता भंग न करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -