'मदर्स डे'ला आईचे अश्रू थांबेनात, पुण्यात काळीज हेलावून टाकणारी घटना

पुणे: 'मदर्स डे'च्या आदल्या दिवशी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. स्वत:च्या लेकराचा मृत्यूने पुण्यात एका आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साधना स्कूलच्या जलतरण तलावात पोहताना एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


हडपसर येथील माळवाडी काळूबाई वसाहत येथील रहिवासी असलेला कृष्णा गणेश शिंदे हा साधना शाळेतील नववीत शिकणारा विद्यार्थी आपल्या पोहायला गेला होता. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जलतरण तलाव आहे. काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा स्विमिंग पूलमध्ये शिरला. त्यावेळी सोबत असलेल्या कृष्णाच्या काकांच्या लक्षात आले की तो तलावात बुडाला आहे. उपस्थित इतरांनी कृष्णाला तातडीने बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कृष्णाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या वेळी जलतरण तलावावर जीवरक्षक उपस्थित होते का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Comments
Add Comment

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे