पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थीनीसोबत धक्कादायक प्रकार घडला. पेपरच्या शेवटच्या तासात एका विद्यार्थिनीला अचानक मासिक पाळी सुरू झाली. त्यानंतर तिने तातडीनं वर्गातील परीक्षकांना याबाबत सांगितलं आणि पॅड लावण्यासाठी बाथरूमला जाण्याची विनंती केली. पण परीक्षारक्षकांनी संतापजनक रिअॅक्शन दिली. “पेपर सुरू असताना बाहेर जाऊ देता येत नाही” असे सांगत परिक्षारक्षकांनी परवानगी नाकारली.


या असंवेदनशील निर्णयामुळे त्या विद्यार्थीनीला उर्वरित पेपर तशाच अवस्थेत बसून पूर्ण करावा लागला.पॅड उपलब्ध नसल्याने डाग पडण्याची भीती, मानसिक ताणतणाव यामुळे त्या विद्यार्थीनीला पेपर लिहिण्यास अडथळा निर्माण झाला असावा, अशी चर्चा आहे. नुकतच सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी व्यवस्थापन हा मुलींचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.तसेच शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याबाबतही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारदेखील मासिक पाळी रजेबाबत सकारात्मक विचार करत आहे.



विद्यार्थिनीच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त


या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ही घटना केवळ एका विद्यार्थिनीची समस्या नसून संपूर्ण व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा अभाव अधोरेखित करणारी आहे. विशेष म्हणजे, पेपर दरम्यान लघवीसाठी परवानगी दिली जाते,मात्र मासिक पाळीसारख्या नैसर्गिक आणि आवश्यक कारणासाठी परवानगी न मिळणे ही गंभीर बाब मानली जात आहे.


या घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार शालेय व्यवस्थापन आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकरणात कोणाही विरोधात वैयक्तिक तक्रार करण्यात आली नाही. ही एक व्यवस्थात्मक त्रुटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे संबंधित परीक्षकांवर कारवाई करण्यापेक्षा संपूर्ण परीक्षा प्रणाली अधिक संवेदनशील आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Comments
Add Comment

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर