सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. पण तीन दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे. अखेरीस पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र जारी केले आहे. या संशयिताची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथं तीन दिवसांपूर्वी १५ मार्च रोजी शाळेमधील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ऍसिड हल्ला केला होता. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी इथं हलवण्यात आलं आहे.


नेमकं काय घडलं?


संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी ही अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने आपल्या घरी जात असताना अचानक तिच्या समोर येऊन अज्ञात एक युवकान तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकलं. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक गोळा झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ऍसिड फेकणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहे. धक्कादायक म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील रणखांब गावात लग्नाला नकार दिल्याने एका मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असताना तालुक्यात घडलेल्या दुसऱ्या घटनेने एकच खळबळ उडाली.


'आरोपीला कडक शिक्षा झााली पाहिजे'


या घटनेने नातेवाईकांसह गावकरीही धास्तावले असून ही घटना कोणत्या कारणावरून झाले हे अजूनही स्पष्ट झाले नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत असून मुलीवर लोणी येथील प्रवरा रूग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहे. मुलीचा चेहरा सात टक्के भाजला आहे. सदर मुलीच्या चेह-यावर अॅसीड फेकणारा तरूण अनोळखी असल्याचं पीडित मुलीचं म्हटलंय.


मुलीच्या घरची गरीब परीस्थिती आहे. शाळेपासून चार किमी अंतरावर हे कुटुंब वस्तीवर राहतात. मुलीला वडिल नाहीत. त्यामुळे मामा त्यांचा सांभाळ करत आहे. या घटनेमुळे कुटुंबीय धास्तावले असून आमच्या मुलीवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आई आणि मामाने केली आहे.


घटनेच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन


दरम्यान, संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथं सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे.. जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे. मुलीवर आज रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे.

Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील