मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास, भा. प्र. से. यांनी दिंडोशी आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकालगत पादचारी पुलाचे एमएमआरडीएचे अति. महानगर आयुक्त श्री गोविंद राज, भा. प्र.से., आणि सह महानगर आयुक्त श्री. एस. राममूर्ती, भा. प्र. से. यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले. हे पूल मेट्रो प्रवाशी, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना पश्चिम द्रुतगती महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यास मदत करतील.
दिंडोशी मेट्रो स्थानकालगत ११२ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद पादचारी पूल आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो मेट्रो स्थानकालगत ८३ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद पादचारी पूल या दोन्ही स्थानकांच्या उत्तरेकडून पूर्व-पश्चिम जोडणी प्रदान करतात. राष्ट्रीय उद्यान ( नॅशनल पार्क) लगतच्या पादचारी पुलामुळे नॅशनल पार्कचा परिसर, अशोक व्हॅन, काजूपाडा, एन. जी. पार्क कॉम्प्लेक्स, बोरिवली पूर्व आणि कुलुपवाडी येथील रहिवाशांना लाभदायक ठरेल. तसेच दिंडोशी येईल उड्डाणपूलामुळे कोकणीपाडा, मालाड पूर्व, गोकुळधाम, फिल्मसिटी आणि पठाणवाडी या भागातील पादचारी आणि नागरिकांना फायदेशीर ठरेल.
बहुउद्देशीय एकात्मिकता (MMI)
एमएमआरडीए ने “मल्टी मॉडेल इंटिग्रेशन म्हणजेच बहुउद्देशीय एकात्मिकता” योजनांचे नियोजन आणि त्याचा आराखडा तयारकरणेचे काम मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या संरेखनात मेट्रो स्थानकांवरून प्रवेशयोग्यता, सुरक्षितता आणि शेवटच्या मैलाची जोडणी या उद्देशाने हाती घेतले आहे. या योजनेत, वाहतूक आणि प्रवाशांच्या कार्यक्षम आणि सुरक्षित दळणवळनासाठी मेट्रो स्थानकाच्या परिसरातील क्षेत्राची पुनर्रचना केली जाईल. यामध्ये राइट ऑफ वे (ROW) ची पुनर्रचना करणे, म्हणजे कॅरेज वे आणि पदपथ, आकाश मार्गीका (फूट ओव्हर ब्रिज -एफओबी), जमिनीखालील पायाभूत सुविधांचे स्थलांतर/पुनर्मार्गीकरण, पथदिवे, बस स्थानकांचे स्थलांतर, पिकअप-ड्रॉप ऑफ ची सुविधा करणे यांचा समावेश आहे. बसेस/आयपीटी/खाजगी वाहनांसाठी, ई-वाहनांद्वारे मेट्रो फीडर, मार्ग शोधण्याचे नकाशे, चिन्हे, ट्रॅफिक सिग्नल/सिग्नल सायकल, सीसीटीव्ही, सुशोभीकरण, रस्त्यावरील फर्निचर आणि प्यूबिक सायकल शेअरिंग (पीबीएस) सुविधा इ. पायाभूत सुविधा अद्ययावत करणे हा मास ट्रान्झिट स्टेशन्सच्या अंतिम ग्रंथव्य स्थानकाच्या वाहतुकीसाठी सरासरी चालण्याचे अंतर असलेल्या प्रत्येक मेट्रो स्टेशन क्षेत्राच्या २५० मीटर अंतरावर चालविण्याचा या योजनेत प्रस्तावित आहे.
सध्या एमएमआरडीए मेट्रो मार्ग ७ च्या संरेख ना तील गुंदवली, गोरेगाव, आरे, दिंडोशी, पोईसर, राष्ट्रीय उद्यान, ओव्हरपाडा या स्थानकांवर एकूण ७ पादचारी पूल बांधत आहे. यापैकी गुंदवली स्थानकावरील पादचारी पूल हा अगोदरच कार्यान्वीत करण्यात आला आहे जो मेट्रो मार्ग ७ ला मेट्रो मार्ग १ सोबत जोडते.
“मल्टी-मॉडल इंटिग्रेशन योजनेचा उद्देश हा मुख्यत्वे मेट्रो स्थानकांपासून सुलभता, सुरक्षितता आणि अंतिम ग्रंथव्य स्थानकापर्यंत वाहतूक वर लक्ष केंद्रित करणे हा आहे. त्यामुळे पादचारी पुल हे मल्टी-मॉडल इंटिग्रेशनचे महत्त्वाचे घटक आहेत. पादचारी पूल हे केवळ मेट्रो प्रवाशांसाठीच नव्हे तर इतर पादचाऱ्यांनाही सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी फायदेशीर ठरतील. अनेक खाजगी कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापने देखील या पादचारी पुलाच्या सहायाने मेट्रो स्थानकांना जोडत आहेत. या प्रकारच्या थेट जोडणी मुळे, लोक रस्ते न ओलांडता थेट मेट्रो स्थानकांवरून मॉल आणि कार्यालयात जाऊ शकतात. यामुळे रस्त्यावरील पादचारी-वाहन ही दगदग तसेच अपघात कमी होतील” असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त श्री एस. व्ही.आर. श्रीनिवास, भा. प्र.से. म्हणाले.