मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने दिल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याने मुख्यमंत्री खुश व समाधानी आहेत, असं नारायण राणे म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं मी अभिनंदन करतो. मी सकाळी ट्विट केल्याप्रमाणे निकाल शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजुने लागलेला आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन”.
पुढे ते म्हणाले की, “जर ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..’ अशा जर आणि तरला मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वतःच्या चुकीमुळे शिवसेना संपली, नियमांचं अज्ञान असल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे हा प्रश्नच आता उरत नाही. माननीय शरद पवार यांनीदेखील आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांची पात्रता, गुणवत्ता काढलेली आहे”.
शिंदे – फडणवीस सरकार जोमाने काम करतंय ते काही लोकांना पचत नाही आहे, त्यामुळे हे सरकार कशा रितीने विकास करु शकतं, लोकहित जपू शकतं याचा प्रत्यय दाखवण्याची ही संधी मिळाली आहे, असं म्हणत नारायण राणेंनी शिंदे – फडणवीस सरकारला शुभेच्छा दिल्या.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…