उपमुख्यमंत्री फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे ३ दिवसांसाठी कर्नाटक दौ-यावर!

  127

भाजपाचा प्रचार आणि देवदर्शन करणार


मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटकात तळ ठोकून असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा भाजपाच्या प्रचाराकरीता तसेच देवदर्शनासाठी कर्नाटकाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, ४ मे पासून कर्नाटकात आहेत. गुरूवारी त्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघ, बेळगाव दक्षिण मतदारसंघ, बेळगाव ग्रामीण मतदारसंघ, येमाकन्नामार्डी मतदारसंघ येथे सभा घेतल्या. याच प्रचारात त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात रोड शोही केला.


काल, शुक्रवारी त्यांनी क्षत्रिय समाज संमेलन, हुबळी-धारवाड पूर्व मतदारसंघ, युवा संमेलन, हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ, अधिवक्ता संमेलन, हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ, पाटीदार समाज संमेलन, हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ येथे सभा घेतल्या. आज ते विजयांगारा जिल्ह्यात हगरीबोम्मनहळ्ळी मतदारसंघात युवा संवाद आणि मतदार मेळावा घेणार आहेत. संध्याकाळी कोप्पल जिल्ह्यातील गंगावती मतदारसंघात मतदार मेळावा घेतील.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावरून कर्नाटक दौऱ्यासाठी प्रस्थान करतील. रात्री साडे नऊ वाजता बंगळुरू येथे त्यांचे आगमन होईल. उद्या, रविवारी सकाळी ६.३० ते ८.०० दरम्यान ते बंगळुरू येथील कब्बन पार्क येथील मतदारांसोबत चालून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.


सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत ते बसवनागुडी येथील दोड्डा गणपती मंदिराला भेट देऊन पूजा व दर्शन घेतील. संध्याकाळी ४.०० ते ७.०० या काळात मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत रोड शोमध्ये सहभागी होतील. चांदपुरा सर्कल ते इग्गालुरू हासुर मेन रोड अनेकल, असा हा रोड शो होणार आहे. रात्री ८.०० वाजता ते बंगळुरू विमानतळावरून मंगळुरूकडे प्रस्थान करतील.


सोमवारी सकाळी ९.०० वाजता हेलिकॉप्टरने धर्मस्थळ येथे रवाना होणार आहेत. सकाळी ९.४० ते १०.४० वाजेपर्यंत मुख्यमंत्री श्री मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट देऊन पूजा आणि दर्शन करतील. तसेच धर्मस्थळ संस्थानचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांचीही ते भेट घेणार आहेत.


११.०० वाजता ते हेलिकॉप्टरने उडुपीकडे प्रस्थान करतील. दुपारी १२ ते १२.३० या काळात ते श्रीकृष्ण मंदिर उडुपी येथे पूजा आणि दर्शन घेतील. दुपारी ३.०० ते ४.०० एकनाथ शिंदे उडुपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.


दुपारी ४.०० ते ५.०० ते उडुपी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. संध्याकाळी ५.०० वाजता ते उडुपीहून हेलिकॉप्टरने मंगळुरूला परतणार आहेत. रात्री ९.०० वाजता मुख्यमंत्री शिंदे मंगळुरू विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Comments
Add Comment

'ड्रग तस्करी प्रकरणी मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई होणार'

मुंबई : ड्रग तस्करी प्रकरणी अटक केलेल्यांवर मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री

उबाठानेच केला मराठीचा घात, शिवसेनेची बॅनरबाजी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा पहिलीपासून शाळेत सक्तीच्या

पुढील शंभर वर्षांचा विचार करुन प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा; अजितदादांची अधिका-यांना तंबी

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला

महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका मुंबई : दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

'पुण्ये अशी येती फळाला' : बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

मुंबई : भाजपा पक्ष संघटनेत फेरबदल झाले असून रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. चव्हाण यांच्या

बीडमधील लैंगिक शोषणाची होणार एसआयटी चौकशी

मुंबई : बीड येथील शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या