‘पीएम श्री योजने’अंतर्गत ठाण्यातील प्रथम टप्प्यात १४ शाळांची निवड

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पीएम श्री योजना’ राबली जात आहे. या योजने अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणांसाठी काम करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील ५ शाळा, महानगरपालिकातील ६ शाळा, नगरपालिका २, शहापुर नगरपंचायत १ अशा प्रकारे शाळांची निवड करण्यात आली आहे.



इमारत दुरुस्ती, नवीन वर्ग खोली, स्वच्छता गृह (मुली, मुले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी), संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब इत्यादी सर्व भैतिक सुविधासाठी शाळेच्या गरजेनुसार शासनाकडे प्रस्ताव सादरिकरण करण्यासाठी कारवाई सुरू आहे.


पीएम श्री योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात निवड झालेल्या शाळांची यादी :




  • जि. प. शाळा डोहळेपाडा, भिंवडी

  • जि. प. शाळा माणिवली, कल्याण

  • जि. प. शाळा कोलठण, मुरबाड

  • जि. प. शाळा शहापूर नं. १

  • जि. प. शाळा वाशिद नं. १, शहापूर

  • जि. प. शाळा काकडवाल, अंबरनाथ

  • बदलापूर नपा, कुळगाव

  • अंबरनाथ नपा ऑडिन्स फॅक्ट्री शाळा

  • भिवंडी मनपा अवचित पाडा उर्दू हायस्कूल

  • कल्याण मनपा तिसगाव शाळा नं. १८

  • नवी मुंबई नमपा आंबेडकर नगर शाळा नं. ५५

  • उल्हासनगर मनपा, शाळा नं. १२

  • ठाणे मनपा शाळा नं. ६२

  • मीरा-भाईंदर मनपा शाळा नं. २२

Comments
Add Comment

मनसे प्रमुख राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर

ठाणे : उत्तर भारतीयांना उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये उत्तर सभा घेतली

घोडबंदर रोडवर उद्यापासून वाहतुकीत बदल

ठाणे : घोडबंदर परिसरातील गायमुख रोडची खालावलेली अवस्था लक्षात घेऊन महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून

बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणातील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल  बदलापूर :  सह्याद्री सुपर सपेशालिस्ट

ठाण्यात ११ डिसेंबरपर्यंत दररोज ३० टक्के पाणीकपात

पाइपलाइन फुटल्याने पुरवठा विस्कळीत ठाणे : कळवा फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीकडून सुरू असलेल्या कामादरम्यान

ठाणे घोडबंदर रोडवर आज वाहतूक कोंडीची शक्यता

दुरुस्तीच्या कामांमुळे जड वाहनांना प्रवेशबंदी ठाणे : ठाण्याचा घोडबंदर रोडवर उद्या (ता. ७) मोठ्या प्रमाणात वाहतूक

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.