केडीएमसीच्या "ह" प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या "ह" प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम कुंभारखान पाडा, होली क्रॉस स्कूल समोरील बांधकामधारक मनोज म्हात्रे, मंदार म्हात्रे, मयूर म्हात्रे यांच्या तळमजल्यासह सहा मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामाचे स्लॅब पाडण्याची कारवाई मंगळवारी दिवसभरात केली. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


ही कारवाई करतेवेळी या ठिकाणी महापालिकेची यंत्रसामग्री व मनुष्यबळ पोहचू नये, याकरिता बांधकामधारकांनी इमारतीकडे जाण्या-या रस्त्यात वाहने ऊभी करुन अडथळा निर्माण केला होता. तथापी संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलीस विभागामार्फत अडथळा दूर करण्याची कारवाई झाल्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि ४ काँक्रीट ब्रेकर व २० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली. सदर बांधकामधारकांवर यापूर्वीच एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागरिकांना कल्याण डोंबिवली‍ परिसरात घरे घेताना महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात किंवा नगररचना विभागाकडे बांधकामाच्या अधिकृततेबाबत चौकशी करुन घरे विकत घेण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर