चैत्यभूमी-दीक्षाभूमीवर उसळला भीमसागर!

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात दिसून येत आहे. मध्यरात्रीपासूनच धूमधडाक्यात जयंतीला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला आहे.



राष्ट्रपती द्रौपदी मूर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.



आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरात बाबासाहेबांच्या सुमारे १०० दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे.



मुंबई महापालिकेने यंदा चैत्यभूमीवर जोरदार तयारी केली आहे. लाखोंचा लोटणारा जनसागर पाहून यावेळी नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


Comments
Add Comment

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

'मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार'

मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना,

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात