Adani Group Report : हा घ्या अदानीच्या २० हजार कोटींचा हिशोब!

Adani Group Report : राहुल गांधी यांच्या २० हजार कोटी कुठून आले? या आरोपानंतर अदानी ग्रुपने मांडला चार वर्षांचा लेखाजोगा


मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करताना वारंवार उद्योगपती गौतम अदानी यांना 'बेनामी कंपन्यांकडून' मिळालेल्या २० हजार कोटी रुपयांचा हिशोब विचारत आहेत. आता खुद्द अदानी समूहाने आपला चार वर्षांचा हिशोब (Adani Group Report) मांडला आहे.


गौतम अदानी ग्रुपचे म्हणणे आहे की, २०१९ पासून ग्रुप कंपन्या सातत्याने त्यांचे स्टेक विकत आहेत. यातून $२.८७ अब्ज (सुमारे २३,५०० कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली आहे. यापैकी $२.५५ अब्ज (सुमारे २०,९०० कोटी रुपये) व्यवसाय विस्तारासाठी पुन्हा गुंतवले गेले आहेत. (Adani Group Report)


हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूह आधीच खूप अडचणीत आला आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. संसदेतील त्यांच्या एका भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सरकार गौतम अदानींना वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


अदानी समूहाचे म्हणणे आहे की, अबू धाबीची स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (आयएचसी) अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये $२.५९ अब्ज (सुमारे २१,००० कोटी) गुंतवणूक केली आहे. समूहाच्या प्रमोटर्सनी अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील हिस्सेदारी विकून $२.७८ अब्ज (सुमारे २२,७०० कोटी रुपये) उभारले आहेत.


समुहाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, स्टेक विकून मिळालेली ही रक्कम नवीन व्यवसायाच्या विकासासाठी गुंतवण्यात आली होती. यासह प्रमोटर्सनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड सारख्या कंपन्यांच्या वाढीसाठी पुन्हा गुंतवणूक केली.


अदानी समूहाने आपल्या निवेदनात 'फायनान्शिअल टाईम्स'च्या वृत्ताचेही खंडन केले आहे. राहुल गांधी यांनी याच वृत्ताचा आधार घेत अदानींच्या बेनामी कंपन्यांमध्ये अचानक २० हजार कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न विचारला होता.


तसेच, अदानी ग्रुप शेअर बाजाराशी संबंधित कायद्यांचे पूर्णपणे पालन करत असल्याचेही अदानी ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा