ठाणे (प्रतिनिधी) : यंदाच्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्ण छाप असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत अनेक योजना, प्रकल्प महापालिकेने हाती घेतले आहेत. त्यानुसार कोणतीही करवाढ व दरवाढ नसणार, काटकसरीचा, आर्थिक शिस्तीचा २०२३-२४ चा ४३७० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी सादर केला.
या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, प्रसूती माता, खड्डेमुक्त रस्ते, शून्य कचरा मोहीम, तलावांचे सौंदर्यीकरण, वाहतूक कोंडी मुक्त ठाणे आदी महत्वाच्या योजनांचा यात समावेश करण्यात आल्याचे दिसत आहे. शिवाय यंदाच्या अर्थसंकल्पावर २७४२ कोटींच्या दायित्वाची झळ बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देताना कोणत्याही नव्या खर्चीक प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले नसल्याचेच दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने २०२२-२३ मध्ये ३३८४ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला होता. मात्र काही विभागांच्या उत्पन्नात घट येत असल्याने महसुली उत्पन्न ३०२१ कोटी ५१ लाखाऐवजी २७८५ कोटी ४५ लाखांचा अर्थसंकल्प सुधारीत करण्यात आला आहे. सुधारीत अर्थसंकल्पात अनुदानापोटी ५७९ कोटी ८१ लाख अपेक्षित धरण्यात आले असून ५१२ कोटी ३५ लाखांचा अनुदान पालिकेला प्राप्त झाले आहे.
यंदाच्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्या अनुषंगानेच महापालिकेने शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून जे काही प्रकल्प हाती घेतले आहेत.
महापालिका हद्दीत दरवर्षी ३६ हजार गरोदर मातांची नोंदणी होत असते. त्यातील १० हजार प्रसूती महापालिकेत होतात. त्यानुसार गर्भवती महिलांच्या नोंदी १२ आठवड्यांत करणे, तसेच प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव, कमी वजनाचे बाळ, आदी समस्या उद्भवतात. याच आनुषंगाने ही योजना हाती घेण्यात आली आहे.
पार्कींग प्लाझा येथे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, माझी आरोग्य सखी अंतर्गत सर्व वयोगटातील महिलांना हेल्थ पॅकेज दिले जाणार आहे. महापालिका क्षेत्रात सीबीएसई शाळा सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…