देशपांडेंवरील हल्ला राजकीय वैमनस्यातून, पोलिसांना संशय कुणावर?

  259

वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर संशय


मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन ते गौप्यस्फोट करणार होते. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला नेमका का झाला आणि कुणी केला? याबाबत स्पष्टता नसली तरी हल्ल्यामागचे एक कारण चर्चिले जात आहे. शिवाय हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.


हिंदूजा रुग्णलयातील उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळी प्रथमदर्शनी हा हल्ला राजकीय वैमनस्यातून केल्याची माहिती समोर आली आहे. काही राजकीय नेत्यांची नावं घेत देशपांडेंवर हल्ला झाला. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांनी राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केल्याचे समजते. परंतू या हल्ल्याचे पडसाद अधिवेशनात उमटल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुप्तता पाळली असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.


संदीप देशपांडे यांच्यावर आज दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत थेट वरूण सरदेसाई यांचे नाव घेत कारवाईची मागणी केली.


आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.


संदीप देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे.


संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी. संदीप देशपांडे गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. आजच्या भ्याड हल्ल्याचे उत्तर नक्की मिळेल. पाठीमागून हल्ले करायचे नाहीत. मर्द असाल तर पुढे या. संदीप देशपांडे सतत मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत असेल आणि त्यांच्यावर हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसायचे का?" असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.


संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. त्यानुसार प्लॅनिंग करून हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आणि हॉस्पिटलला पोलीस अधिकारी पोहचले. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येणार असून हा हल्ला कुणी केला याचा पोलीस शोध घेत आहेत.


या घटनेबद्दल सांगताना मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी म्हणाले की, देशपांडे नेहमीप्रमाणे वॉकला गेलेले असताना हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. स्टम्पने हा हल्ला केला. तोंडावर रुमाल लावून ते आले होते. आम्ही कुणावरही आरोप करणार नाही. परंतु हा हल्ला करणाऱ्याला शोधणार नक्की, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र