कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेत आधारवाडी येथील रौनक सिटीतील इमारतीच्या १४ मजल्यावर आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. घरात स्वंपाक करत असलेल्या वयस्कर महिलेच्या अंगावरील कपड्यांनी अचानक पेट घेतला. त्यात ती भाजली असून तिच्या जळत्या कपड्यांमुळे घराला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली.
रचना कौशल (६२ वर्ष) असे आगीमध्ये भाजलेल्या महिलेचे नाव आहे. आधारवाडी येथील रोनक सिटीच्या बी ९ या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील एका सदनिकेत राहते. बुधवारी दुपारी ४ च्या दरम्यान त्या स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना तिच्या अंगावरील कपड्यानी अचानक पेट घेतली. त्यात त्या महिला भाजल्या गेल्या. शेजारी आणि इमरातीतील नागरिकांना माहिती मिळताच त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयत दाखल करण्यात आले.
जळत्या कपड्यांमुळे घरात आग लागली असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान त्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यत आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. तब्बल दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.