Thursday, April 30, 2026

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता 'गिनीज वर्ल्ड बुक' मध्ये नोंद झाली आहे. यातून भारतीय इंजिनिअरिंगच्या कामाची, कलेची ताकद दिसून येत आहे. डोंगराळ भागात साकारलेल 'मिसिंग लिंक' आता जगाच्या नकाशावर चमकणार आहे. कारण या पुलाची' गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद झाली आहे.

जागतील सर्वात रुंद बोगदा

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार या बोगद्याची रुंदी विक्रमी असून १० लेन ची वाहतूक एकाच वेळी या लेनमधून कारण शक्य होणार आहे.. जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर असलेला केबल-स्टेड ब्रिज या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आहे.

प्रवाशांचा वेळ वाचणार

पुण्याचा प्रवास म्हणजे घाटांचा प्रवास लोणावळा, खंडाळा घाट पार करत पुण्यात प्रवेश होतो . धोकादायक वळणांवर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी आणि यात फुकट जाणारा वेळ यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. हाच पुण्याच्या प्रवास आता साधारण २० ते २५ मिनिटे कमी होणार असून, १०० किमी प्रति तास या वेगाने गाड्या या मरगावरून धावू शकणार आहेत.

तूर्तास अवजड वाहनांना असणार प्रवेश बंदी

१ मे महाराष्ट्र दिनापासून या पुलाचे उदघाटन होणार असून हलक्या गाड्या म्हणजे कर, बस यासारख्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षेचा कारणास्तव अवजड वाहनांना तूर्तास बंदी असणार आहे.

या मिसिंग पुलाच्या आजूबाजूला असणारी गर्द हिरवाई या पुलाची शोभा आणखीनच वाढवत आहेत. शिवाय खंडाळा आणि लोणावळा येथील वाहतूक कोंडी या पुलामुळे फुटणार आहे. या १० पदरी पुलामुळे मुंबई - पुण्याचा प्रवास आता सुसाट होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >