वधूची आई फोटो काढायला स्टेजवर गेली अन् चोरट्याने दागिन्यांची बॅग लांबवली

ठाणे : ठाण्यातील वॉकरवाडी भागात एका लग्न सोहळ्यात वधूची आई लग्न लागल्यानंतर स्टेजवर फोटो काढण्यास गेली. तेवढ्या वेळात चोरट्याने स्टेजवरील दागिन्यांनी भरलेली बॅग लांबवली.


ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीजवळ असलेल्या वॉकरवाडी ग्राउंडवर एका विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. लग्नसोहळा व्यवस्थित पार पडल्यानंतर नवरीची आई मुलीच्या लग्नामध्ये घेऊन आलेली दागिने भरलेली बॅग स्टेजजवळ ठेऊन फोटो काढण्यासाठी स्टेजवर चढली. त्याचवेळी संधीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने ती दागिन्यांनी भरलेली बॅग घेवून पोबारा केला.


आपण स्टेजवळ ठेवलेली बॅग गायब झाल्याचे नवरीच्या आईच्या लक्षात येताच तिने बोंबाबोंब केली.


दरम्यान, अज्ञात चोरट्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक एम. एस. खणकर अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच