कल्याण (वार्ताहर) : इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे आयोजित गप्पा माय-लेकीच्या कार्यक्रमातून महिलांच्या विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती.
पौगंडावस्थेतील मुलींमधील अनियमित मासिक पाळीची समस्या, पीसीओडी आजार, कमी वयातील गर्भधारणा, तिशीनंतरची गर्भधारणा आणि त्यातील धोके, वंध्यत्व, मातृत्व, पालकत्व, महिलांमधील लठ्ठपणा, मानसिक आजार, बदललेली दिनचर्या – आहार, मासिक पाळी आणि धार्मिक संबंध अशा विविध मुद्द्यांवर या कार्यक्रमात खुलेपणाने चर्चा झाली. यावेळी उपस्थित महिलांनीही तितक्याच मनमोकळ्या पद्धतीने दाद दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी एक कलाकार म्हणून, एक मुलगी म्हणून , एक सून म्हणून आलेले कौटुंबिक अनुभव यावेळी सर्वांसमोर उलगडून दाखवले. त्यांचे अनुभव ऐकताना उपस्थित महिला वर्गाच्या डोळ्याच्या कडा आपसूकच पाणावल्याचे दिसून आले.
डॉ. वर्षा फडके, डॉ. सोनाली चौधरी, डॉ. सफिया फरीद या नामांकित स्त्रीरोग तज्ञांनी पौगंडावस्थेतील मुली आणि प्रौढ महिलांना सध्या भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांचे अतिशय सोप्या शब्दांत निराकरण केले. तर सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉ. नितीन पाटणकर, रेडीओलॉजीस्ट डॉ. प्रशांत पाटील यांनी आरोग्य विषयक समस्यांवर प्रकाश टाकला. डॉ. मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी केडीएमसीचे उपआयुक्त अतूल पाटील, सचिव संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे डॉ. आश्विन कक्कर, डॉ. ईशा पानसरे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. संदेश रोठे, डॉ. प्रशांत खटाळे, डॉ. हिमांशु ठक्कर, डॉ. विकास सुरंजे आदींनी विशेष मेहनत घेतली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…